04 March 2021

News Flash

भारतीय महिलांची न्यूझीलंडवर ४-० ने मात, कर्णधार राणी रामपाल चमकली

भारतीय महिलांचा धडाकेबाज खेळ

राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात धडाकेबाज विजयाची नोंद केली आहे. कर्णधार राणी रामपालने झळकावलेल्या दोन गोलच्या आधारावर भारताने या सामन्यात ४-० ने विजय मिळवला. राणीव्यतिरीक्त शर्मिला आणि नमिता टोपो यांनीही एक-एक गोल झळकावला.

न्यूझीलंड दौऱ्यावर आलेला भारतीय महिला संघ, ३ सामने न्यूझीलंडविरुद्ध आणि एक सामना इंग्लंडच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांना मध्यांतरापर्यंत गोल करता आले नाहीत. अखेरीस राणी रामपालने तिसऱ्याी सत्रात पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावत भारताचं खातं उघडलं. यानंतर भारतीय महिलांनी सामन्यात मागे वळून पाहिलच नाही. एकामोगामाग एक हल्ले चढवत भारतीय महिलांनी आपली आघाडी ४-० ने वाढवली. न्यूझीलंडच्या महिलांनी अखेरच्या सत्रात काही सुरेख चाली रचल्या, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2020 1:31 pm

Web Title: rani rampal strikes twice as indian womens hockey team begin new zealand tour with 4 0 win psd 91
Next Stories
1 ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडररचा शतकमहोत्सव!
2 व्यग्र वेळापत्रकाशी जुळवणे सिंधूची जबाबदारी -गोपीचंद
3 आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या अभावामुळे सायकलिंगमध्ये भारत पिछाडीवर!
Just Now!
X