News Flash

Asian Games 2018 : समारोप समारंभात राणी रामपाल भारताची ध्वजधारक

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या रविवारी होणाऱ्या समारोप कार्यक्रमासाठी भारताची ध्वजधारक म्हणून निवड करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या रविवारी होणाऱ्या समारोप कार्यक्रमासाठी भारताची ध्वजधारक म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘‘रविवारी होणाऱ्या सांगता समारंभात राणी भारताची ध्वजधारक असणार आहे,’’ असे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले.

भारताचा पराभव

मिश्र सांघिक ज्युडोमध्ये कझाकस्तानने भारताला ४-० असे पराभूत केले. भारतीय संघात विजय कुमार यादव, हर्शदीप सिंग ब्रार, कल्पना देवी थौडम आणि गरिमा चौधरी यांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2018 3:22 am

Web Title: rani rampal to be indias flag bearer holder at closing ceremony
Next Stories
1 मलिंगाचे श्रीलंका संघात पुनरागमन
2 Asian Games 2018 : स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवर क्रीडामंत्री म्हणतात…
3 Asian Games 2018 : अभिमानास्पद! एशियाडच्या इतिहासात भारताची सर्वोत्तम कामगिरी
Just Now!
X