24 November 2020

News Flash

रणजी क्रिकेट : सौराष्ट्राविरुद्ध सामन्यासाठी मुंबईच्या संघात धवल कुलकर्णीचं पुनरागमन

सिद्धेश लाडकडे मुंबईचं नेतृत्व

तब्बल ४१ वेळा रणजी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईची यंदाच्या हंगामात अतिशय खराब सुरुवात झालेली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत मुंबईला एकही निर्णयाक विजय मिळवता आलेला नाहीये. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीसाठी आपलं आव्हान कायम राखायचं असल्यास मुंबईला सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं बनलेलं आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या धवल कुलकर्णीला सौराष्ट्राविरुद्ध सामन्यात संघात जागा मिळालेली आहे. या सामन्यातही सिद्धेश लाड मुंबईचं नेतृत्व करणार आहे.

सौराष्ट्राविरुद्ध सामन्यासाठी असा असेल मुंबईचा संघ –

सिद्धेश लाड (कर्णधार), श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शिवम दुबे, जय बिस्ता, आकाश पारकर, विक्रांत औटी, शुभम रांजणे, कर्श कोठारी, ध्रुमिल मटकर, रोस्टन डायस, मिनाद मांजरेकर, तनुष कोटियन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2018 5:42 pm

Web Title: ranji cricket mumbai team announced for game against saurashtra dhawal kulkarni makes comeback
टॅग Mca,Ranji Cricket
Next Stories
1 IPL Auction 2019: युवराज ‘मुंबईकर’ झाल्याने बॉलिवूडचा ‘सिम्बा’ झाला खुश, म्हणाला…
2 IND vs AUS : ‘कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाच जिंकणार!’
3 आयपीएल लिलावामुळे नशीब फळफळलं, एका रात्रीत दोघे भाऊ झाले कोट्यधीश
Just Now!
X