News Flash

दिल्लीसमोर मुंबईची घसरगुंडी

हरयाणा आणि पंजाबवर विजय मिळवणाऱ्या मुंबईची घरच्या मैदानावर दिल्लीसमोर मात्र घसरगुंडी उडाली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात

| November 15, 2013 03:33 am

हरयाणा आणि पंजाबवर विजय मिळवणाऱ्या मुंबईची घरच्या मैदानावर दिल्लीसमोर मात्र घसरगुंडी उडाली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या रणजी सामन्यात मुंबईने पहिल्या दिवसअखेर ६ बाद २५२ धावा केल्या आहेत.
 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा सलामीवीर कौस्तुभ पवार फक्त आठ धावा करून तंबूत परतला. आदित्य तरे आणि वासिम जाफर (६१) यांनी ९४ धावांची भागीदारी करत डाव सावरला. त्यानंतर आदित्य तरेने (५३) सिद्धेश लाडच्या साथीने ५६ धावा जोडत मुंबईला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला. तरे बाद झाल्यावर मुंबईच्या डावाची घसरगुंडी उडाली. सिद्धेश लाडने ७४ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 3:33 am

Web Title: ranji trophy 2013 14 mumbai skids infront of delhi
Next Stories
1 सायनाला पराभवाचा धक्का
2 वानखेडे बेभान-वेडे!
3 सबकुछ सचिन..
Just Now!
X