News Flash

मुंबईचा ‘खडूस’ खेळ, त्रिपुरावर १० गडी राखून मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

दुसऱ्या डावात पृथ्वीची वादळी खेळी

मुंबई रणजी संघाचे संग्रहीत छायाचित्र

४१ वेळा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाने यंदाच्या हंगामातही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. आपल्या खडूस खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या संघाने घरच्या मैदानावर खेळताना दुबळ्या त्रिपुराच्या संघावर १० गडी राखून मात केली. दुसऱ्या डावात त्रिपुराच्या संघाने दिलेलं ६३ धावांचं आव्हान मुंबईच्या फलंदाजांनी ६.२ षटकात पूर्ण करुन सामना आपल्या नावे केला. पृथ्वी शॉने वादळी खेळी करत दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं, तर पहिल्या डावातला शतकवीर जय बिस्ताने त्याला १३ धावा काढून चांगली साथ दिली. या विजयासह मुंबईने ७ गुणांची कमाई केली असून, मुंबईच्या विजयाने आंध्रप्रदेशच्या संघाचं उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.

संपूर्ण सामन्यात मुंबईचा वरचष्मा पहायला मिळाला. पहिल्या डावात २२६ धावांची आघाडी घेतलेल्या मुंबईच्या संघाने आपला डाव ४२१/८ या धावसंख्येवर घोषित केला. मात्र मुंबईच्या माऱ्यासमोर कसाबसा बचाव करत त्रिपुराने २८८ धावांपर्यंत मजल मारली. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी विजय आवश्यक असल्यामुळे मुंबईच्या फलंदाजांनी त्रिपुराने दिलेलं आव्हान झटपट पार करत विजय संपादन केला.

असा आहे सामन्याचा संक्षिप्त धावफलक –

त्रिपुरा १९५ आणि २८८ (यशपाल सिंह ८२, समित पटेल ६८; कर्ष कोठारी ४/७२, धवल कुलकर्णी ४/६९) मुंबई ४२१/८ डाव घोषीत आणि बिनबाद ६४ (पृथ्वी शॉ ५०, जय बिस्ता १३)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 9:30 am

Web Title: ranji trophy 2017 18 mumbai beat tripura by 10 wickets and enters quarter final
टॅग : Mca,Prithvi Shaw
Next Stories
1 Photos: महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे ‘ब्लॅकबेल्ट’, पुत्र आर्यमनलाही ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदक
2 कुटुंबवत्सल प्रशिक्षक बेर्गामास्को भारताच्या यशाचे शिल्पकार
3 पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय
Just Now!
X