07 March 2021

News Flash

विदर्भ ६ बाद २४३ धावा

कर्णधार फैज फजलचे अर्धशतक 

(संग्रहित छायाचित्र)

कर्णधार फैज फजलचे अर्धशतक 

कर्णधार फैज फजलचे अर्धशतक आणि अक्षय वाडकर, मोहित काळे यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर विदर्भाने रेल्वे विरुद्ध सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत पहिल्या दिवसअखेर सहा बाद २४३ धावांपर्यंत मजल मारली.

ही स्पर्धा दिल्लीच्या कर्णेल सिंग स्टेडियमवर सुरू आहे.  विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र, केवळ ३६ धावांवर असताना सलामीवीर आर. संजय केवळ १२ धावांवर बाद झाला आणि विदर्भाला पहिला झटका मिळाला. त्यानंतर आलेला अनुभवी फलंदाज वसीम जाफर आणि फैजने विदर्भाला शंभरी गाठून दिली. मात्र, वसीमही फार काळ टिकाव धरू शकला नाही आणि ३० धावांवर असताना मधुर खत्रीने वसीमचा त्रिफळा उडवला. दुसरा झटकाही लवकरच मिळाल्याने कर्णधार फैज फजलने संयमी फलंदाजी करण्यावर भर दिला आणि सावध फलंदाजी करत ८९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. चौवथ्यास्थानी आलेला गणेश सतिशही विशेष कामगिरी करू शकला नाही आणि तोही चार धावांवर असताना अविनाश यादवचा बळी ठरला तेव्हा विदर्भ १०४ धावांवर होता. हीच धावसंख्या कायम असताना कर्णधार फैजला मधुर खत्रीने पायचित केले आणि त्याची खेळी संपुष्टात आणली. फैजने ९३ चेंडूत आठ चौकारच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्यानंतर अक्षय वाडकर आणि रणजी सामन्याचा कमी अनुभव असलेल्या मोहित काळेने संयमी खेळी साकारत विदर्भाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचे योगदान दिले. विदर्भाची स्थिती चार बाद १०४ धावांवर असताना मोहित आणि अक्षयने सक्षमतेने गोलंदाजांचा सामना केला आणि सावध फलंदाजी करत धावफलक हालता ठेवला आणि ९५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि विदर्भाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. मोहित रणजी करंडकाच्या पहिल्याच अर्धशतकाच्या उंबरठय़ावर असताना चोरटी धाव घेताना धावबाद झाला आणि त्याचे पहिले अर्धशतक केवळ चार धावांनी हुकले. मोहितने १०४ चेंडूत तीन चौकारच्या मदतीने महत्त्वपूर्ण ४६ धावा केल्या. अक्षय वाडकर आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना अविनाश यादवने त्याचा त्रिफळा उडवला. अक्षयने ९७ चेंडूत दोन चौकारच्या मदतीने ४८ धावा केल्या. अक्षय कर्णेवार (२६) आणि आदित्य सरवटे (१३) खेळपट्टीवर कायम आहे. पहिल्या डावात दिवसअखेर विदर्भाने सहा बाद २४३ धावा केल्या. अविनाश यादवने तीन तर मधुर खत्रीने दोन गडी टिपले.

संक्षिप्त धावफलक : विदर्भ (पहिला डाव) ६ बाद २४३ (फैज फजल ५३, वसीम जाफर ३०, अक्षय वाडकर ४८, मोहित काळे ४६; अविनाश यादव ३/६९, मधुर खत्री २/४७).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 1:27 am

Web Title: ranji trophy 2018 13
Next Stories
1 गॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये
2 राशिद खानकडून पुन्हा एकदा धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची पुनरावृत्ती, हा व्हिडीओ पाहाच
3 IND vs AUS : दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना शिस्तबद्ध खेळ करण्याची गरज – हनुमा विहारी
Just Now!
X