07 July 2020

News Flash

केदारच्या शतकाने महाराष्ट्राला तारले

केदारने मात्र एक बाजू लावून धरताना १५ चौकार व एका षटकारासह नाबाद १०३ धावा केल्या आहेत

केदार जाधव

पहिल्या डावात छत्तीसगडला २२३ धावांची आघाडी

रायपूर : अनुभवी खेळाडू केदार जाधवने झळकावलेल्या सुरेख नाबाद शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगडविरुद्धच्या ‘अ’ गटातील साखळी लढतीत दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारली आहे.

त्यापूर्वी अजय मंडळ, अमनदीप खरे व आशुतोष सिंग या तिघांनी साकारलेल्या शतकांमुळे छत्तीसगडने पहिल्या डावात तब्बल ४६२ धावांचा डोंगर उभा करत २२३ धावांची आघाडी घेतली. महाराष्ट्रासाठी अनुपम संकलेचाने सर्वाधिक पाच बळी मिळवले.

प्रत्युत्तरात महाराष्ट्राने दुसऱ्या डावात २४ धावांतच सलामीवीर गमावले. मात्र ऋतुराज गायकवाडसह (३४) तिसऱ्या गडय़ासाठी केदारने ९३ धावांची भागीदारी करत संघावरील नामुष्की टाळली. सलामीवीरांना बाद करणाऱ्या ओमकार वर्मानेच ऋतुराजलाही बाद करत ही जोडी फोडली. केदारने मात्र एक बाजू लावून धरताना १५ चौकार व एका षटकारासह नाबाद १०३ धावा केल्या आहेत. दिवसअखेरीस केदारसह कर्णधार अंकित बावणे १० धावांवर खेळत आहेत. मंगळवारी सामन्याचा अखेरचा दिवस असून महाराष्ट्र अद्याप ५१ धावांनी पिछाडीवर आहे. मात्र पहिल्या डावातील आघाडीमुळे छत्तीसगडचे पारडे सामन्यात अधिक जड आहे. त्यामुळे सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राला पराभव टाळण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागणार आहे.

संक्षिप्त धावफलक

’महाराष्ट्र (पहिला डाव) : ६८.३ षटकांत सर्वबाद २३९

’छत्तीसगड (पहिला डाव) : १४०.५ षटकांत सर्वबाद ४६२

’महाराष्ट्र (दुसरा डाव) : ४४ षटकांत ३ बाद १७२ (केदार जाधव खेळत आहे १०३, ऋतुराज गायकवाड ३४; ओमकार वर्मा ३/५३).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 1:57 am

Web Title: ranji trophy 2018 kedar jadhav hundred keeps maharashtra in safe zone
Next Stories
1 विराट कोहली सर्वोत्कृष्ट कर्णधार
2 ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, धोनीचं पुनरागमन
3 IND vs AUS : विराट कोहली सज्जन माणूस – रवी शास्त्री
Just Now!
X