News Flash

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : रेल्वेकडे १५२ धावांची आघाडी ; कर्ण शर्माचे झुंजार शतक

पृथ्वीकडून दुसऱ्या डावातही निराशा मुंबई : कर्णधार कर्ण शर्माने झुंजार फलंदाजी केल्यामुळे रेल्वेला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ब-गटातील मुंबईविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात १५२ धावांची समाधानकारक आघाडी

| December 27, 2019 12:04 am

पृथ्वी शॉ

पृथ्वीकडून दुसऱ्या डावातही निराशा

मुंबई : कर्णधार कर्ण शर्माने झुंजार फलंदाजी केल्यामुळे रेल्वेला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ब-गटातील मुंबईविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात १५२ धावांची समाधानकारक आघाडी घेता आली. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर मुंबईचा संघ दुसऱ्या डावात ३ बाद ६४ असा झगडत आहे.

कर्णने १५ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ११२ धावांची खेळी साकारली. त्याला अरिंदम घोषने १२ चौकारांसह ७२ धावा करीत छान साथ दिली. त्यामुळे ५ बाद ४३ अशी सुरुवात झालेल्या रेल्वेला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला बुधवारी ११ वाजून ३० मिनिटांनी प्रारंभ झाला. रेल्वेने ५ बाद ११६ धावसंख्येवरून पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. डावखुरा शर्मा आणि घोष यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा सावधपणे सामना करीत सहाव्या गडय़ासाठी ११६ धावांची भागीदारी केली. मध्यमगती गोलंदाज आकाश पारकरने घोषला बाद करून ही जोडी फोडली. मग शर्माने अविनाश यादवच्या (५३ चेंडूंत ३४ धावा) साथीने सातव्या गडय़ासाठी ८५ धावांची भागीदारी केली. यादव बाद झाल्यानंतर शर्माला योग्य साथ न मिळाल्याने रेल्वेचा डाव २६६ धावांत आटोपला. मुंबईचा मध्यमगती गोलंदाज तुषार देशपांडेने ४४ धावांत ४ बळी घेतले.

मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. ४ चौकारांसह फक्त २३ धावा काढून तो माघारी परतला. दुसरा सलामीवीर जय बिस्तासुद्धा १३ धावांवर बाद झाल्याने मुंबईची २ बाद ३७ अशी अवस्था झाली. मग सिद्धेश लाडनेही (८) निराशा केल्यामुळे मुंबईला ४५ धावांवर तिसरा धक्का बसला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा अजिंक्य रहाणे ३ आणि कर्णधार सूर्यकुमार यादव १५ धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक

* मुंबई (पहिला डाव) : ११४

* रेल्वे (पहिला डाव) : ७४.१ षटकांत सर्व बाद २६६ (कर्ण शर्मा नाबाद ११२, अरिंदम घोष ७२; तुषार देशपांडे ४/४४)

* मुंबई (दुसरा डाव) : २२ षटकांत ३ बाद ६४ (पृथ्वी शॉ २३; हिमांशू सांगवान २/११)

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:04 am

Web Title: ranji trophy 2019 20 karn sharma century put railways in strong position against mumbai zws 70
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्रापुढे आघाडी मिळवण्याचे आव्हान
2 देवांग गांधी यांना ड्रेसिंगरूममध्ये अनधिकृत प्रवेश भोवला
3 भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकत्रित खेळणार नाहीत -बीसीसीआय
Just Now!
X