रणजी करंडक स्पर्धेत शुक्रवारचा दिवस हा नाट्यमय घडामोडींचा ठरतो आहे. बलाढ्य महाराष्ट्राचा संघ सेनादलासमोर पहिल्या डावात अवघ्या ४४ धावांत गारद झाला. तर पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात, शुभमन गिलने पंचांना शिवीगाळ केल्यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला. याचसोबत केरळ विरुद्ध हैदराबाद सामन्यातही, थरारक प्रसंग घडला.
अवश्य वाचा – Ranji Trophy : पहिल्या डावात महाराष्ट्राची घसरगुंडी, ४४ धावांत संघ माघारी
पहिल्यांदा फलंदाजी करत असताना, केरळच्या संघाची सुरुवात खराब झाली. १० व्या षटकात हैदराबादचा गोलंदाज रवी किरणने डाकलेला चेंडू उसळी घेत थेट केरळचा फलंदाज रोहन प्रेमच्या हेल्मेटमध्ये शिरला. हा प्रकार घडल्यानंतर मैदानात उपस्थित सर्वांनी रोहनच्या दिशेने धाव घेतली…पाहा हा व्हिडीओ
सुदैवाने रोहनला या प्रसंगादरम्यान कोणतीही दुखापत झाली नाही. केरळचे सलामीवीर भोपळाही न फोडता माघारी परतले. यानंतर जलज सक्सेना आणि रॉबिन उथप्पा यांनाही फारशी चांगली कामगिरी बजावता आली नाही. त्यामुळे उद्याच्या दिवसात नेमकं काय घडतं हे पहावं लागणार आहे.
अवश्य वाचा – Ranji Trophy : मैदानात हायवोल्टेज ड्रामा, शुभमन गिलची पंचांना शिवीगाळ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2020 5:54 pm