News Flash

Ranji Trophy : द्विशतकी खेळीत पृथ्वी शॉचा विक्रम, सचिन-रोहित शर्माला टाकलं मागे

बडोद्याविरुद्ध मुंबईला विजयाची संधी

उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी बंदीची शिक्षा भोगून पुनरागमन केलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉने धडाकेबाज खेळी केली आहे. २०१९-२० हंगामातला आपला पहिला रणजी सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉने बडोद्याविरुद्ध दुसऱ्या डावात द्विशतकी खेळीची नोंद केली आहे. पृथ्वी शॉने १७९ चेंडूत २०२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १९ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

या खेळीदरम्यान पृथ्वी शॉने मुंबईतल्या संघातले आपले दिग्गज सहकारी यांचा विक्रम मोडला आहे. गेल्या २५ वर्षांत भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पृथ्वीने रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारे फलंदाज –

  • पृथ्वी शॉ – १७४ चेंडू
  • श्रेयस अय्यर – १७५ चेंडू
  • रोहित शर्मा – १८५
  • सचिन तेंडुलकर – १८८

मुंबईने दुसऱ्या डावात बडोद्याला विजयासाठी ५३४ धावांचं आव्हान दिलं आहे. दुसऱ्या डावातही बडोद्याची सुरुवात खराब झाली आहे. सलामीचे ३ फलंदाज अवघ्या ७४ धावांमध्ये माघारी परतले आहेत. शम्स मुलानीने २ तर तुषार देशपांडेने एका फलंदाजाला माघारी धाडलं आहे. तिसऱ्या दिवसाअखेरीस मुंबईकडे अद्यापही ४६० धावांची आघाडी आहे, त्यामुळे अखेरच्या दिवशी बडोद्याच्या फलंदाजांना सामना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 6:52 pm

Web Title: ranji trophy 2019 20 prithvi shaw scores record breaking double hundred psd 91
टॅग : Prithvi Shaw
Next Stories
1 गोलंदाज, फलंदाज नव्हे; तर अंपायर करणार विक्रम
2 मुंबईच्या मैदानात विराटसेनेने रोखलं कॅरेबिअन वादळ, टी-२० मालिकेतही मारली बाजी
3 अफगाणिस्तानचं नेतृत्व पुन्हा एकदा असगर अफगाणकडे
Just Now!
X