भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये दादा संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई संघासमोर आगामी हंगामात खडतर आव्हान असणार आहे. यंदा झालेल्या विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईच्या संघाची कामगिरी यथा-तथा होती. मात्र रणजी क्रिकेटमध्ये मुंबई संघाचा इतिहास मोठा आहेत. आतापर्यंत ४० वेळा मुंबईने रणजी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात मुंबईचा संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

२०१९-२० हंगामात मुंबईचे सामने पुढीलप्रमाणे असतील –

  • मुंबई विरुद्ध बडोदा – ९ ते १२ डिसेंबर (बडोदा)
  • मुंबई विरुद्ध रेल्वे – २५-२८ डिसेंबर (मुंबई)
  • मुंबई विरुद्ध कर्नाटक – ३ ते ६ जानेवारी (मुंबई)
  • मुंबई विरुद्ध तामिळनाडू – ११ ते १४ जानेवारी (चेन्नई)
  • मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश – १९ ते २२ जानेवारी (मुंबई)
  • मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश – २७ ते ३० जानेवारी (धर्मशाळा)
  • मुंबई विरुद्ध सौराष्ट्र – ४ ते ७ फेब्रुवारी (राजकोट)
  • मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश – १२ ते १५ फेब्रुवारी (मुंबई)