रोहतक : फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील हरियाणाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात महाराष्ट्र संघ पराभवाच्या छायेत सापडला आहे. फॉलोऑनची नामुष्की पत्करणाऱ्या महाराष्ट्राची तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ५ बाद ६१ धावा अशी अवस्था झाली असून ते अद्यापही ९३ धावांनी पिछाडीवर आहेत. रोहतक येथे सुरू असलेल्या या सामन्यात मंगळवारच्या ४ बाद ८८ धावांवरून पुढे खेळताना महाराष्ट्राचा पहिला डाव २४७ धावांत आटोपला. कर्णधार नौशाद शेखने महाराष्ट्रासाठी सर्वाधिक ६० धावा केल्या. हर्षल पटेलने चार बळी मिळवून महाराष्ट्राला अडीचशेच्या आत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2019 3:26 am