News Flash

Ranji Trophy 2019 : पृथ्वी शॉचं द्विशतक, बडोद्याला विजयासाठी डोंगराएवढं आव्हान

मुंबईचे फलंदाज चमकले

२०१९-२० हंगामात आपला पहिला रणजी सामना खेळणाऱ्या मुंबईने बडोद्यासमोर विजयासाठी ५३४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने झळकावलेलं द्विशतक आणि त्याला कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद १०२ धावा करत दिलेली उत्तम साथ या जोरावर मुंबईने दुसऱ्या डावात ४ गड्यांच्या मोबदल्यात ४०९ धावांपर्यंत मजल मारली. पृथ्वी शॉने २०२ धावा केल्या.

पहिल्या डावात मुंबईने सांघिक खेळाच्या जोरावर ४३१ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल बडोद्याचा पहिला डाव ३०७ धावांवर आटोपला. बडोद्याकडून सलामीवीर केदार देवधरने नाबाद १६० धावांची खेळी केली, त्याला विष्णू सोळंकीने ४८ धावा काढून चांगली साथ दिली. मुंबईकडून शम्स मुलानीने ६ बळी घेतले. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने धडाकेबाज खेळी करत २०२ धावांची खेळी केली. त्याला जय बिस्ता आणि सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करत चांगली साथ दिली.

मुंबईच्या या आक्रमक खेळामुळे बडोद्याला विजयासाठी ५३४ धावांची गरज आहे. दुसऱ्या डावातही बडोद्याची सुरुवात खराब झाली आहे. सलामीचे ३ फलंदाज अवघ्या ७४ धावांमध्ये माघारी परतले आहेत. शम्स मुलानीने २ तर तुषार देशपांडेने एका फलंदाजाला माघारी धाडलं आहे. तिसऱ्या दिवसाअखेरीस मुंबईकडे अद्यापही ४६० धावांची आघाडी आहे, त्यामुळे अखेरच्या दिवशी बडोद्याच्या फलंदाजांना सामना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 4:28 pm

Web Title: ranji trophy 2019 prithvi shaw slams double ton huge target for baroda to win match psd 91
टॅग : Ranji Trophy
Next Stories
1 भारतालाही डोपिंगचा फटका! दोन खेळाडूंचे निलंबन
2 IND vs WI : मयांक अग्रवालचं वन-डे संघात पदार्पण, धवनच्या जागी संघात स्थान
3 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताची विक्रमी पदकझेप!
Just Now!
X