07 July 2020

News Flash

महाराष्ट्राचा ७० धावांत खुर्दा

प्रत्युत्तरात सत्यजितने सात बळी पटकावल्यामुळे रेल्वेचा संघ ९ बाद १८४ धावा अशा अडचणीत सापडला आहे.

पहिल्या दिवसअखेर रेल्वेकडे ११४ धावांची आघाडी; अविनाश-सत्यजित यांची प्रभावी गोलंदाजी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

दिल्ली : दिल्लीच्या कर्नेल सिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटातील रेल्वेविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीत महाराष्ट्राचा पहिला डाव अवघ्या ७० धावांवर संपुष्टात आला. डावखुरा फिरकीपटू अविनाश यादवने चार बळी पटकावत महाराष्ट्राच्या डावाला खिंडार पाडले. सत्यजित बच्छावच्या भेदक गोलंदाजीमुळे दिवसअखेर रेल्वेची ९ बाद १८४ धावा अशी अवस्था झाली असली तरी त्यांच्याकडे ११४ धावांची आघाडी आहे.

प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. दोन्ही सलामीवीर भोपळाही फोडू शकले नाहीत, तर ऋतुराज गायकवाड (९) व कर्णधार राहुल त्रिपाठीदेखील (८) अविनाशच्या फिरकीचे शिकार ठरले. सत्यजितने संघातर्फे सर्वाधिक १५ धावा केल्या. हर्ष त्यागी व आशीष यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेत अविनाशला सुयोग्य साथ दिली. त्यामुळे महाराष्ट्राचा संपूर्ण संघ २३.२ षटकांत उपाहारापूर्वीच गारद झाला.

प्रत्युत्तरात सत्यजितने सात बळी पटकावल्यामुळे रेल्वेचा संघ ९ बाद १८४ धावा अशा अडचणीत सापडला आहे. मात्र कर्णधार महेश रावतच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे रेल्वेने पहिल्या डावात आघाडी मिळवली आहे. दरम्यान, उभय संघांचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र (पहिला डाव) : २३.२ षटकांत सर्व बाद ७० (सत्यजित बच्छाव १५; अविनाश यादव ४/३८, हर्ष त्यागी २/२)

रेल्वे (पहिला डाव) : ६० षटकांत ९ बाद १८४ (महेश रावत खेळत आहे ५२, गंधार भटवडेकर ३७; सत्यजित बच्छाव ७/७३).

सत्यजित बच्छाव २८-५-७३-७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 2:02 am

Web Title: ranji trophy avinash yadav four wickets helped railways skittle maharashtra for 70
Next Stories
1 राज्याला अग्रस्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना विशेष प्रशिक्षण -तावडे
2 IND vs AUS : पॉन्टिंगबुवांचे फसले सगळे अंदाज
3 भारताच्या ऐतिहासिक विजयानंतरही शास्त्री गुरुजींना ‘या’ कारणासाठी नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Just Now!
X