गुजरात विरुद्ध सौराष्ट्र आणि बंगाल विरुद्ध कर्नाटक यांच्यात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती रंगणार आहेत.

फिरकीपटू कृष्णप्पा गौथम याने सात बळी घेतल्याने कर्नाटकने जम्मू आणि काश्मीर संघावर १६७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. याबरोबरच कर्नाटकने उपांत्य फेरी गाठली. सौराष्ट्राने आंध्र प्रदेशविरुद्धची लढत बरोबरीत सोडवत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली. सौराष्ट्राने विजयासाठी ठेवलेल्या ७१० धावांच्या प्रत्युत्तरात आंध्र प्रदेशला दुसऱ्या डावात ४ बाद १४९ धावाच करता आल्या. बंगालने ओदिशाविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर आगेकूच केली. तर गुजरातने रविवारीच गोव्याला नमवून उपांत्य फेरी गाठली होती.