07 August 2020

News Flash

विदर्भाचे पोट्टे जिंकले ! रणजी करंडक अंतिम फेरीत बलाढ्य दिल्लीवर मात

अंतिम फेरीत दिल्लीवर ९ गडी राखून मात

सामना जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करणारा विदर्भाचा संघ. फोटो सौजन्य - पीटीआय

आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच रणजी सामन्याची अंतिम फेरी गाठणाऱ्या विदर्भाने आज इंदूरच्या होळकर मैदानावर विक्रमाची नोंद केली. रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत विदर्भाने दिल्लीवर ९ गडी राखून मात केली. दुसऱ्या डावात विदर्भासमोर विजयासाठी अवघ्या २९ धावांचं आव्हान होतं. हे आव्हान विदर्भाच्या फलंदाजांनी लीलया पार केलं. दुसऱ्या डावात अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या माऱ्यासमोर दिल्लीचा संघ फारकाळ तग धरु शकला नाही. दुसऱ्या डावात ध्रुव शौरी आणि नितीश राणा तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत विदर्भाचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अखेर तोकडेच पडले.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर विदर्भाचा पहिला डाव ५४७ धावांमध्ये संपवण्यात दिल्लीला यश आलं. मधल्या फळीत अक्षय वाडकरने केलेली शतकी खेळी आणि त्याला आदित्य सरवटे, सिद्धेश नेरळ आणि अनुभवी वासिम जाफरने दिलेली साथ या जोरावर विदर्भाने पहिल्या डावात २५२ धावांची आघाडी घेतली. या आव्हानाचा पाठलाग करुन विदर्भासमोर विजयासाठी धावसंख्येचं आव्हान देणं ही कठीण बाब मानली जात होती. याचप्रमाणे दिल्लीच्या फलंदाजांनी विदर्भाच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्करत सामन्यात विजयासाठी अवघ्या २९ धावांचं आव्हान दिलं.

यंदाच्या हंगमात विदर्भाच्या संघाने केलेली कामगिरी ही नक्कीच वाखणण्याजोगी होती. पहिल्या सामन्यात विदर्भाने पंजाबवर एक डाव आणि ११७ धावांनी विजय मिळवला. विदर्भाचा दुसरा सामना हा छत्तीसगडविरुद्ध घरच्या मैदानावर झाला, मात्र हा सामना अनिर्णित राहिला. यानंतर सेनादल, बंगाल आणि गोवा यांना लागोपाठ पराभूत करत विदर्भाने हंगामावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. विदर्भाचा आपल्या घरच्या मैदानावरचा हिमाचल प्रदेशविरुद्धचा अखेरचा सामना हा मात्र अनिर्णीत राहिला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत विदर्भाने केरळला तर उपांत्य सामन्यात कर्नाटकचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्लीने आतापर्यंत ७ वेळा रणजी करंडकाचं विजेतेपज पटकावलं आहे, त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होईल असा सर्वांनी अंदाज व्यक्त केला होता. मात्र चंद्रकांत पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सर्वांचे अंदाज खोटे ठरवत आपलं पहिलं वहिलं रणजी विजेतेपद पटकावलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 5:01 pm

Web Title: ranji trophy final 2017 18 vidarbha clain their first ranji title beat delhi in final by 9 wickets
टॅग Vidarbha
Next Stories
1 चेतेश्वर पुजारा बनणार बाबा, ट्विटरवरुन दिली आनंदाची बातमी
2 फिल सिमन्स अफगाणिस्तानचे नवीन प्रशिक्षक
3 शास्त्रींमुळे भारतीय खेळाडू अपयशाने घाबरुन जात नाहीत, सहायक प्रशिक्षक संजय बांगरची स्तुतीसुमनं
Just Now!
X