धरमशाला : मुंबई आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील ‘ब’ गटाचा रणजी करंडक क्रिकेट सामना गुरुवारी अनिर्णीत राहिला. सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू खेळवता आला नाही. मुंबईच्या खात्यावर आता सहा सामन्यांद्वारे फक्त १३ गुण जमा असल्यामुळे बाद फेरीची वाट बिकट झाली आहे.

हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर फक्त सोमवारीच खेळ होऊ शकला. मुंबईने पहिल्या डावात ३७२ धावांची मजल मारली. यात सर्फराज खानच्या नाबाद २२६ धावांचे महत्त्वाचे योगदान होते. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी खेळ होऊ शकला नाही.

सौराष्ट्रविरुद्ध सूर्यकुमार खेळणार

सौराष्ट्रविरुद्ध ४ फेब्रुवारीपासून राजकोटला सुरू होणाऱ्या आगामी रणजी सामन्यासाठी अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघात परतला आहे.

मुंबईचा संघ : आदित्य तरे (कर्णधार), सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, जय बिस्ता, शुभम रांजणे, सर्फराज खान, आकाश पारकर, शाम्स मुलानी, तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस, शशांक अत्तार्डे, विनायक भोईर, आकिब कुरेशी, भूपेन लालवानी, दीपक शेट्टी.