मुंबई आणि रेल्वे यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेचा सामना वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे, अशी स्पष्टोक्ती मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली आहे.
‘‘१५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणारा मुंबई-रेल्वे रणजी सामना सामना हलवण्यात यावा, अशी विनंती आम्ही केली होती. मात्र फार कमी वेळ उपलब्ध असल्यामुळे ती मान्य होऊ शकली नाही. त्यामुळे हा सामना वानखेडेवरच होणार आहे,’’ असे एमसीएचे संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले.
नुकताच मुंबई-उत्तर प्रदेश यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात जवळपास १२०० धावा निघाल्या. त्यामुळे मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने हा सामना पवार स्टेडियमवर घ्यावा, अशी विनंती केली होती. वानखेडेवर २५ ऑक्टोबरला झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विक्रमी ४३८ धावा उभारून २१४ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.