News Flash

शेन वॉर्नच्या तुलनेत कुंबळे, आफ्रिदी माझे आवडते गोलंदाज – राशिद खान

कुंबळे-आफ्रिदीच्या गोलंदाजीतला वेग मला भावतो - खान

राशिद खान (संग्रहीत छायाचित्र)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. फिरकीचा जादूगार अशी ओळख असलेल्या शेन वॉर्नने १४५ कसोटीत ७०८ तर १९४ वन-डे सामन्यांमध्ये २९३ बळी घेतले आहेत. मात्र एवढी मोठी कामगिरी करुनही अफगाणिस्तानचा नवोदीत फिरकीपटू राशिद खानला शेन वॉर्न आवडत नाही. यासाठी राशिद खानकडे ठोस कारणही आहे. सेलिब्रेटी अँकर गौरव कपूर याच्या ‘ब्रेकफास्ट विथ चँपियन’ या कार्यक्रमात राशिद खानने हा खुलासा केला आहे.

शेन वॉर्न हा हळु गोलंदाजी करत असल्याने मी तरुण असताना तो मला फारसा आवडायचा नाही. त्यातुलनेत अनिल कुंबळे आणि शाहिद आफ्रिदी हे दोन्ही गोलंदाज मला अधिक जवळचे वाटायचे. त्यांच्या गोलंदाजीत वेग होता. याच कारणासाठी मला त्यांची गोलंदाजी अधिक आवडायची. टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची चमक दाखवल्यानंतर राशिद खान अफगाणिस्तानकडून भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. मात्र या सामन्यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 9:22 pm

Web Title: rashid khan wasnt a fan of a legendary leggie and there is a strong reason
टॅग : Rashid Khan
Next Stories
1 आयसीसीकडून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारताची सलामीला कॅरेबियन टेस्ट
2 भारताचा ‘हिटमॅन’ यो-यो फिटनेस चाचणी पास, अजिंक्य रहाणेच्या आशा मावळल्या
3 हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा द्या, नवीन पटनाईकांची नरेंद्र मोदींकडे मागणी
Just Now!
X