सोशल मीडिया हे सध्या असे माध्यम आहे, ज्यावर कुठलीही घटना घडली की लगेच चर्चेला उधाण येते. तसेच कुठल्याही घटनेबाबत मीम्स व्हायरल होण्यासही फारसा वेळ लागत नाही. लोकप्रिय व्यक्तींबद्दलचे मीम्स तर सातत्याने व्हायरल होतच असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्समधील सातत्याने दिसणारा चेहरा म्हणजे टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री. भारतीय क्रिकेट संघाला जेव्हा केव्हा पराभवाचा सामना करावा लागतो, त्यावेळी सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून रवी शास्त्री यांना लक्ष्य केले जाते. मात्र कधी कधी विजयानंतरही शास्त्री यांचे मीम्स व्हायरल होतात. सध्या त्यांचे असेच एक मीम चर्चेत आहे.

Ind vs Eng: भारताच्या ‘या’ खेळाडूची चौथ्या कसोटीतून माघार; BCCIने दिली माहिती

भारतीय संघाने इंग्लंडला अहमदाबाद कसोटीत १० गडी राखून पराभूत केले आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. हा सामना अवघ्या दोन दिवसांत निकाली निघाला. याच मुद्द्यावरून सोशल मिडीयावर भन्नाट मीम्स व्हायरल झाले. त्यातील काही मीम्समध्ये रवी शास्त्री यांचाही समावेश होता. यातील एका मीममध्ये रवी शास्त्री यांचे छायाचित्र होते, तसेच त्यावर “तुम्हाला काय वाटलं… (सामना जिंकल्यावरही) मी पाच दिवस ड्राय स्टेट (दारूबंदी असलेल्या राज्यात) मध्ये राहू शकेन?”, असं लिहिलं होतं. हे मीम प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्विटरवर शेअर केलं आणि त्यात रवी शास्त्री यांना टॅग केलं. रवी शास्त्री यांनी हे स्वत:चं ट्वीट शेअर केलं आणि त्यावर भन्नाट रिप्लाय दिला. “अशी गंमत (मीम्स) मला आवडते. या कठीण काळात लोकांच्या चेहऱ्यावर हसून आणू शकल्याने मी आनंदी आहे”, असं ट्वीट त्यांनी केलं.

Ind vs Eng: चौथ्या कसोटीआधी इंग्लंडला धक्का; स्टार खेळाडूची माघार

चौथ्या सामन्यासाठी बुमराह संघाबाहेर

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने चौथ्या आणि शेवटच्या कसोटीतून माघार घेतली आहे. काही वैयक्तिक कारणांसाठी चमूतून आणि बायो-बबलमधून बाहेर जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती बुमराहने बीसीसीआय व्यवस्थापनाला केली होती. त्यानुसार त्याला संघातून रिलीज करण्यात आले आहे, अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी कोणत्याही बदली खेळाडूला चमूत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही.