भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंड दौर्‍यावर आहे. कोहली आधुनिक क्रिकेटमधील चार सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. विराटसाठी २०१४ मध्ये इंग्लंडचा दौरा खराब ठराला होता. स्विंग गोलंदाजी समोर विराट टिकत नसे. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात कोहलीने १०  डावात १३.४ च्या सरासरीने केवळ १३४ धावा केल्या होत्या. चार वर्षांनंतर, तो यशस्वी फलंदाज म्हणून परतला आणि २०१८ च्या द्विपक्षीय मालिकेत त्याने १० डावात ५९.३ च्या सरासरीने ५९३ धावा केल्या.

३२ वर्षीय कोहलीने आतापर्यंत ६० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून यामध्ये भारताने ३६ विजय मिळवले आहेत. सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा तो भारतीय कर्णधार आहे.

हेही वाचा-जडेजा सारखा खेळाडू  इंग्लंडला मिळाला तर…’ पीटरसन म्हणाला…

प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, २०१४ च्या दौऱ्यानंतर कोहली सुधारला आहे व त्याने अनुभव घेतला आहे. २०१४ चा कोहली आता स्लिमर आणि फिट झाला आहे. तो संघाचा कर्णधार आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. ”

इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी कोहलीने भारतीय माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सर्व प्रथम मी चार वर्षांनी मोठा आहे. हाच मोठा फरक आहे. पण मानसिकता बदलली आहे, असे मला वाटत नाही. बाहेर जाऊन संघासाठी कामगिरी करण्याची माझी मानसिकता नेहमीच होती.”