News Flash

शास्त्रीसह सहयोगी प्रशिक्षकही भारताच्या प्रशिक्षकपदांसाठी अर्ज करणार

येत्या काही दिवसांत प्रशिक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

| June 1, 2016 05:23 am

येत्या काही दिवसांत भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाकडून राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या पदांसाठी जाहिरात दिली जाणार असून, भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यासह संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधरसुद्धा अर्ज करणार आहेत.

येत्या काही दिवसांत प्रशिक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. शास्त्रीसह फलंदाजीचे प्रशिक्षक बांगर, गोलंदाजीचे प्रशिक्षक अरुण आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधर अर्ज करणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याच्या आदल्या दिवशी सर्व सहयोगी प्रशिक्षकांनी त्यांची भेट घेतली होती. या पदासाठी योग्यता असलेल्या प्रत्येकाने अर्ज करावेत, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले होते. शास्त्री यांच्या १८ महिन्यांच्या कार्यकाळातील कामगिरीबाबतही ठाकूर यांनी समाधान प्रकट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 5:23 am

Web Title: ravi shastri with assistant coach also apply for indias coach
टॅग : Ravi Shastri
Next Stories
1 पारदर्शक कारभारावर भर देणार -शिर्के
2 भारतीय महिला हॉकी संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा धक्का
3 अॅलिस्टर कुकने तोडला सचिनचा रेकॉर्ड
Just Now!
X