News Flash

संघात निवड न झाल्याने अश्विनचा ‘या’ संघाकडून खेळण्याचा निर्णय

वन-डे मालिकेत सिनीअर खेळाडूंना विश्रांती

रविचंद्र अश्विन (संग्रहीत छायाचित्र)

भारतीय कसोटी क्रिकेटच्या दृष्टीकोनातून एक चांगली बाब समोर येत आहे. भारतीय संघातील रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, इशांत शर्मा हे खेळाडू काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. श्रीलंका दौरा आटोपल्यानंतर हे तिन्ही खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहेत. ESPN Cricinfo या वेबसाईटने याविषयीचं वृत्त प्रसारित केलं आहे. रविचंद्रन अश्विन हा वुस्टरशायर संघाकडून खेळणार आहे.

याव्यतिरीक्त इशांत शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे खेळाडूही यंदाच्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहेत. रविंद्र जाडेजाही या स्पर्धेत सहभागी होणार असून त्याच्या संघाविषयी अद्यापही माहिती मिळू शकलेली नाहीये. काऊंटी क्रिकेट खेळणाऱ्या एकाही खेळाडूची श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेच्या संघात निवड झालेली नाहीये.

अवश्य वाचा – श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी संघ जाहीर, पालघरच्या शार्दुल ठाकूरचा संघात समावेश

चेतेश्वर पुजारा यंदाच्या हंगामातही नॉटींगहॅमशायर या संघाकडून मैदानात उतरेल. अश्विन आणि पुजारा हे ५ सप्टेंबर रोजी वुस्टरशायर विरुद्ध नॉटींगहॅमशायर संघाच्या सामन्यात समोरासमोर उभे ठाकतील. आगामी वर्षात भारत इंग्लंडचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चारही खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव मिळणं संघासाठी फायद्याचं मानलं जातंय.

अवश्य वाचा – गावसकरांच्या ‘या’ मताशी तुम्ही सहमत आहात का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 2:21 pm

Web Title: ravichandran ashwin confirm playing in county cricket in england
Next Stories
1 ‘मेस्सी जैसा कोई नहीं’ चाहत्यांकडून रोनाल्डोचं ट्रोलिंग
2 गावसकरांच्या ‘या’ मताशी तुम्ही सहमत आहात का?
3 मिशन श्रीलंका फत्ते!! कसोटी मालिका ३-० ने भारताच्या खिशात
Just Now!
X