26 February 2021

News Flash

जाडेजा ‘सर’सच!; कोहली, अश्विनला मागे टाकत ठरला सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू

मायदेशातील अप्रतिम कामगिरीचा गौरव

रवींद्र जाडेजा

ईएसपीएनक्रिकइन्फो या संकेतस्थळाने रवींद्र जाडेजाची २०१६-१७ या मोसमातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. संकेतस्थळाने सर्वोत्कृष्ट खेळाडूची निवड करताना वाचकांची मते मागवली होती. या पोलमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला मागे टाकत जाडेजाने सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला.

इएसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळाच्या तज्ज्ञांच्या पॅनलकडूनही रवींद्र जाडेजाची मोसमातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. या विशेष पॅनलमध्ये माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर, अजित आगरकर आणि आकाश चोप्रा यांचा समावेश होता. सप्टेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत मायदेशात झालेल्या १३ कसोटी सामन्यांमध्ये जाडेजाने जबरदस्त कामगिरी केली. या १३ कसोटींमध्ये जाडेजाने २२.३ च्या सरासरीने गोलंदाजी केली, तर फलंदाजीतील जाडेजाची सरासरी ४२.७६ इतकी होती.

इएसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळावर सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू निवडण्यासाठी २०,५०० जणांनी मत नोंदवले. यातील ६५ टक्के मत जाडेजाला मिळाली. यासोबतच तज्ज्ञांच्या पॅनलमधील १० पैकी ६ जणांनी जाडेजाला पसंती दिली. एकूण २०,५०० मतांपैकी चेतेश्वर पुजाराला १२ टक्के मते मिळाली, तर तज्ज्ञांच्या पॅनलमधील दोन जणांनी पुजाराला पसंती दिली. अश्विन आणि कोहलीला प्रत्येकी एका सदस्याने पसंती दर्शवली.

मोसमातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून हसीब हमीदची निवड करण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगलेल्या चार कसोटी मालिकेतील बंगळुरु कसोटी सामन्याची यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम सामना म्हणून निवड करण्यात आली. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथची सर्वोत्तम पाहुणा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या पॅनलमधील सर्वच्या सर्व १० जणांनी स्मिथच्या नावाची निवड केली. यासोबतच एकूण ९२ टक्के वाचकांनी स्मिथच्या नावाला पसंती दिली.

वेगवान गोलंदाज उमेश यादवला बेस्ट सपोर्ट अॅक्टसाठी निवडण्यात आले. बेस्ट सपोर्ट अॅक्ट निवडण्यासाठी ७ हजार वाचकांनी मत नोंदवले. यामधील ३७ टक्के मत उमेश यादवला मिळाली. तर के. एल. राहुल ३१ टक्के आणि वृद्धिमान साहाला २९ टक्के मते मिळाली. संकेतस्थळाच्या तज्ज्ञांच्या पॅनलमधील १० पैकी ७ जणांनी उमेश यादवच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 5:09 pm

Web Title: ravindra jadeja becomes best cricketer of the season in espn cricinfo readers and expert panel poll
Next Stories
1 २ कोटींचे मानधन खूपच कमी, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जास्त मिळतात: रवी शास्त्री
2 IPL 2017: कोहलीच्या अनुपस्थितीत शेन वॉटसनकडे बंगळुरुची धुरा
3 फेडररची स्वप्नवत वाटचाल
Just Now!
X