ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान रविंद्र जाडेजाला झालेल्या दुखापतीवरुन सध्या बरीच चर्चा सुरु आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह काही माजी खेळाडूंनी सामनाधिकारी डेव्हीड बून यांच्या निर्णयाला आक्षेप घेतला असून माजी भारतीय खेळाडूंनी बून यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय. नाबाद ४४ धावांची खेळी करणाऱ्या जाडेजाला स्टार्कचं अखेरचं षटक खेळत असताना हेल्मेटला बॉल लागला. ज्यानंतर तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही, त्यामुळे चहलला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली.

भारतीय संघाचा युवा खेळाडू संजू सॅमसनने जाडेजा ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर त्याला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. “स्टार्कचं अखेरचं षटक खेळत असताना जाडेजाच्या हेल्मेटला बॉल लागला, यानंतर तो ड्रेसिंग रुममध्ये आला, फिजीओ नितीन पटेल यांनी त्याला कसं वाटतंय असं विचारलं?? ज्यावर त्याने मला जरा चक्कर आल्यासारखं होतंय…असं उत्तर दिलं. सध्या जाडेजावर डॉ. अभिजीत साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.”

अवश्य वाचा – जाडेजावर अविश्वास नाही पण चहल त्याची रिप्लेसमेंट कशी ठरु शकतो??

५ बाद ९२ अशी परिस्थिती असताना रविंद्र जाडेजाने मैदानात एक बाजू लावून धरत फटकेबाजी केली. २३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह जाडेजाने नाबाद ४४ धावा केल्या. चहल मैदानावर येण्याच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर, माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडी, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी आक्षेप घेतला. दरम्यान ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतलेली आहे, या मालिकेतला दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : Playing XI मध्ये नसतानाही चहल गोलंदाजीला कसा आला?, जाणून घ्या नियम