24 September 2020

News Flash

धोनी आणि रैनाला लग्नपत्रिका पाठवणार नाही – रविंद्र जाडेजा

मी अद्याप त्यांना लग्नपत्रिका पाठवलेली नाही आणि पाठवणारही नाही.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा हा येत्या १७ एप्रिल रोजी रिवासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्न सोहळ्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेयर्ससोबत काही परदेशी प्लेयर्सही सहभागी होणार आहेत. लग्नाच्या एक दिवसपूर्वी म्हणजेच १६ एप्रिलला जड्डू टीम इंडियातील त्याच्या सहका-यांसोबत पार्टीदेखील करणार असल्याचे कळते. मात्र, या लग्नाची पत्रिका टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांना रविंद्र जाडेजा देणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
रविंद्र जाडेजा याने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, धोनी आणि रैना यांना मी अद्याप लग्नपत्रिका पाठवलेली नाही आणि पाठवणारही नाही. याचे कारण जाडेजाने सांगितले की, हे दोघेही माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि आपल्या इतक्या जवळच्या मित्रांना लग्न पत्रिका पाठविण्याची मला गरज वाटत नाही. त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून मी त्यांना फोन करणार आहे.
येत्या १७ एप्रिलला जड्डू हा रिवा सोलंकीसोबत विवाहबद्ध होईल. तीन दिवस चालणा-या या सोहळ्याचे आयोजन अगदी खासगी पद्धतीने करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 4:31 pm

Web Title: ravindra jadeja didnt invite ms dhoni suresh raina to his wedding
टॅग Ravindra Jadeja
Next Stories
1 आयपीएलच्या ‘नव’लाईला प्रारंभ
2 बॉलीवूड सादरीकरणासह आयपीएलच्या नवव्या हंगामाचे उद्घाटन
3 नरिनची गोलंदाजी दोषमुक्त ठरल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सला दिलासा
Just Now!
X