News Flash

रविंद्र जाडेजा आतापर्यंतचा भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – प्रवीण आमरे

जाडेजाच्या थ्रो-मध्ये प्रचंड ताकद आहे !

रविंद्र जाडेजा

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा हा एक उपयुक्त खेळाडू मानला जातो. अखेरच्या फळीत फटकेबाजी करण्याची क्षमता, गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण या गुणांमुळे कसोटी असो किंवा टी-२०, वन-डे…रविंद्र जाडेजा भारतीय संघात आपलं स्थान राखून असतो. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुंबईकर प्रवीण आमरे यांनी रविंद्र जाडेजाचं कौतुक केलं आहे. जाडेजा हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असल्याचं आमरे यांनी म्हटलं आहे. ते Sportskeeda संकेतस्थळाच्या Instagram Live Session मध्ये बोलत होते.

“रविंद्र जाडेजाला मैदानात क्षेत्ररक्षणादरम्यान मी पाहिलं आहे. त्याला बॉलचा अंदाज चांगला येतो, तसंच त्याच्या थ्रो मध्येही जबरदस्त ताकद आहे. आतापर्यंत त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत.” आमरे जाडेजाच्या क्षेत्ररक्षणाविषयी बोलत होते. टीम इंडियात सध्याच्या घडीला विराट कोहली, मनिष पांडे यांसारखे काही चांगले क्षेत्ररक्षकही आहेत, मात्र आमरे यांनी आपली पहिली पसंती रविंद्र जाडेजाला दिली आहे.

देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या सर्व महत्वाच्या क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान हे मोठं असणार आहे, त्यामुळे वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येईल का याबद्दल बीसीसीआय चाचपणी करत आहे. रविंद्र जाडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं प्रतिनिधीत्व करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 1:18 pm

Web Title: ravindra jadeja is best indian player says former indian cricketer pravin amre psd 91
Next Stories
1 विराटने ‘हा’ फोटो पोस्ट करत उडवली पुजाराची खिल्ली
2 अश्विनच सर्वोत्तम ऑफ स्पिनर – हरभजन
3 ‘हा’ संघ ठरू शकतो ‘विराटसेने’साठी डोकेदुखी – रवी शास्त्री
Just Now!
X