News Flash

‘सर जाडेजा’ २१ व्या शतकातला भारताचा Most valuable player, विस्डनकडून बहुमान

तिन्ही क्षेत्रात जाडेजाची सर्वोत्तम कामगिरी

रविंद्र जाडेजा

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. Wisden ने जाडेजाला २१ व्या शतकातला भारताचा Most valuable player म्हणून घोषित केलं आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत जाडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्यामुळे त्याची या बहुमानासाठी निवड झालेली आहे. तिन्ही क्षेत्रात जाडेजाच्या कामगिरीचा अभ्यास केल्यानंतर विस्डनने जाडेजाचं नाव घोषित केलं आहे. ९७.३ गुण मिळवत जाडेजाने हा मान पटकावला आहे.

“रविंद्र जाडेजाची या स्थानासाठी निवड झाल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटू शकतं. कसोटी क्रिकेटमध्ये संघाची निवड होताना तो कधीही पहिली पसंती नसतो. पण ज्यावेळेला त्याला संधी मिळाली आहे, त्या सामन्यांत जाडेजाने गोलंदाजीत चांगली कामगिरी करत सहाव्या स्थानावर आश्वासक फलंदाजी केली आहे. त्याच्या गोलंदाजीची सरासरी ही अनेक माजी दिग्गज गोलंदाजांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. याव्यतिरीक्त फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या निकषांमध्येही जाडेजा उजवा आहे.” Wisden साठी माहिती गोळा करणाऱ्या Cricviz संस्थेच्या फ्रेडी वाईल्ड यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

अवश्य पाहा – ‘सर जाडेजां’च्या घराचा राजेशाही थाट

२००९ साली जाडेजाने भारतीय संघात पदार्पण केलं. यानंतर त्याने आतापर्यंत ४९ कसोटी, १६५ वन-डे आणि ४९ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आयपीएलमध्ये जाडेजा धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 8:09 pm

Web Title: ravindra jadeja named indias most valuable player of 21st century psd 91
Next Stories
1 ‘हेच का संस्कार?’ विचारणाऱ्या चाहत्याला अश्विन म्हणतो…
2 “मला वाटलं ताप आहे, पण तो करोना होता”
3 टिक टॉक बंदीवरून अश्विनने घेतली वॉर्नरची फिरकी, म्हणाला…
Just Now!
X