भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाला यंदाचा मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १२ सदस्यांच्या समितीने रविंद्र जाडेजासह १९ खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. बायुचंग भूतिया, मेरी कोम यासारख्या दिग्गज खेळाडूंचा या समितीमध्ये समावेश होता.

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत रविंद्र जाडेजाने आश्वासक कामगिरी केली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जाडेजाने ५९ चेंडूत ७७ धावा केल्या होत्या, मात्र दुर्दैवाने या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. रविंद्र जाडेजाने आतापर्यंत ४१ कसोटी, १५६ एकदिवसीय आणि ४२ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. रविंद्र जाडेजासोबत गोळाफेकपटू तेजिंदरपाल सिंह तूर, धावपटू मोहम्मद अनस, स्वप्ना बर्मन, फुटबॉलपटू गुरप्रितसिंह संधू, हॉकीपटू चिंगलेन साना आणि महिला नेमबाज अंजुम मुद्गीलचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
An account of the work done in 10 years is presented in BJP resolution
‘मोदी की गॅरंटी’चा जाहीरनाम्यात पुनरुच्चार; भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त १० वर्षांतील कामांचा लेखाजोखा सादर
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान