सध्या भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. मात्र पहिल्या दोन सामन्यामध्ये जाडेजा ऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान मिळाल्यामुळे जाडेजा सध्या आराम करतोय. या फावल्या वेळेत जाडेजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला सध्या इन्स्टाग्रामवर लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेदरलँड दौऱ्यादरम्यानचा सायकलवरचा फोटो आणि आपला सायकलवरचा फोटो एकत्र करुन इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला आहे. ”मोदी सर तुमचे मनापासून आभार. जगभरातल्या प्रत्येक भारतीयला तुम्ही तुमच्या कामांमधून प्रेरणा देत आहात. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो”, म्हणत जाडेजाने नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

https://www.instagram.com/p/BV6GUOSFLmG/

पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँडच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट यांनी एक सायकल भेट दिली होती. यानंतर मोदींचा सायकलवर बसलेल्या फोटोला लोकांची आपली पसंती दर्शवली होती. त्याआधी मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेतली होती.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या रविंद्र जाडेजाला नुकताच कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. जाडेजाने आपल्या मुलीचं नाव निध्याना असं ठेवलं आहे.

जाडेजाला विश्रांती देऊन पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने कुलदीप यादवला संधी दिली होती. त्यातच दुसऱ्या सामन्यात कुलदीपने चांगली कामगिरी केल्यामुळे तिसऱ्या सामन्यात जाडेजाला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा सामना हा शुक्रवारी अँटीगा येथे खेळवण्यात येणार आहे.