News Flash

‘‘त्या दीड वर्षात मला रात्रीची झोप यायची नाही”, स्टार क्रिकेटपटूने सांगितला वाईट काळातील अनुभव

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघात अनेक स्टार खेळाडूंचे पुनरागमन होत असते. काही खेळाडू चांगली कामगिरी करू न शकल्यामुळे संघाबाहेर पडतात. त्यानंतर पुन्हा संघात येण्यासाठी त्यांना फार धडपड करावी लागते. या काळात त्यांना मानसिक तणावही येतो. टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजानेही याबाबत किस्सा सांगितला आहे. जडेजा दीड वर्ष भारतीय संघाबाहेर होता. त्याने कसोटी तसेच वनडे संघातील स्थान गमावले होते. संघातून आपले स्थान गमावल्यानंतर आपण कोणत्या परिस्थितीला सामोरे गेलो, याबद्दल जडेजाने प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – जबरदस्त क्रिकेट कारकीर्द असूनही क्रिकेटच्या देवाला वाटतेय ‘या’ दोन गोष्टींची खंत!

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जडेजा म्हणाला, ”खरंच, त्या दीड वर्षात एक वेळ अशी आली होती, की मला रात्रभर झोप येत नव्हती. त्यावेळी मी पहाटे ४-५ वाजता उठत असे. संघात पुन्हा कसे जायचे, हा विचार मी करत असायचो. मी अंथरुणावर पडायचो, पण जागाच असायचो. मी कसोटी संघात होतो, पण जेव्हा मी विदेशी दौर्‍यावर होतो, तेव्हा मला खेळण्याची संधी मिळत नव्हती. मी एकदिवसीय संघात नव्हतो. मला स्थानिक क्रिकेटदेखील खेळता आले नाही, कारण मी भारतीय संघासह प्रवास करीत होतो. मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत नव्हती. पुनरागमन कसे करावे याचा मी विचारात राहिलो.”

हेही वाचा – चुकीला माफी नाही! अंपायरविरुद्ध वापरली अपमानास्पद भाषा, मग ICCनं ठोठावला मोठा दंड

२०१८मध्ये दुणावला आत्मविश्वास

२०१८मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात जडेजासाठी सर्वकाही बदलले आणि त्याचा आत्मविश्वास खूप वाढला. जडेजा आता आता भारतीय खेळणार्‍या इलेव्हनमधील प्रथम पसंती बनला होता. मात्र त्यानंतर जाडेजा आठव्या स्थानावर आला आणि त्याने १५६ चेंडूंत नाबाद ८६ धावा केल्या. भारतीय संघ इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करीत होता. भारताने १६० धावा देऊन ६ बळी गमावले होते आणि त्यानंतर जडेजाने जबरदस्त खेळी खेळली.

हेही वाचा – अवघ्या ‘दोन’ शब्दात विराटने सांगितले धोनीसोबतचे नाते!

या खेळीनंतरही भारताला हा सामना १८८ धावांनी गमवावा लागला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला १-४ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर जडेजाचा आत्मविश्वास दुणावला. तो म्हणाला, ”या कसोटीने माझे सर्वकाही बदलले. माझ्या कामगिरीने, विश्वासाने सर्व काही बदलले. जेव्हा आपण इंग्लंडमध्ये सर्वोत्तम गोलंदाजांविरूद्ध धावा करता, तेव्हा त्याचा तुमच्या खेळावर परिणाम होतो आणि आत्मविश्वास वाढतो. आपले तंत्र चांगले आहे आणि आपण जगात कोठेही धावा करू शकता, असे आपल्याला वाटते.” जडेजाने आतापर्यंत ५१ कसोटी, १६८ एकदिवसीय आणि ५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 4:35 pm

Web Title: ravindra jadeja recalled his ordeal when he was away from the indian team adn 96
Next Stories
1 जबरदस्त क्रिकेट कारकीर्द असूनही क्रिकेटच्या देवाला वाटतेय ‘या’ दोन गोष्टींची खंत!
2 चॅम्पियन्स लीग : मँचेस्टर सिटीला नमवत चेल्सीने पटकावले विजेतेपद
3 चुकीला माफी नाही! अंपायरविरुद्ध वापरली अपमानास्पद भाषा, मग ICCनं ठोठावला मोठा दंड
Just Now!
X