कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर मात केली. विंडीजने विजयासाठी दिलेले ३१६ धावांचे आव्हान भारताने ४ गडी राखून पूर्ण केले. २०१९ वर्षातला भारताचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामुळे वर्षाची अखेर भारताने २-१ अशी मालिका विजयाने केली.

विराट = रनमशिन… सलग चौथ्या वर्षी केला ‘हा’ विक्रम!

विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना विराट त्रिफळाचीत झाला. ८५ धावांवर त्याला माघारी परतावे लागले. यानंतर रविंद्र जाडेजा आणि मुंबईकर शार्दुल ठाकूर या दोघांनी योग्य वेळी फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला. त्या महत्त्वाच्या वेळी जाडेजाने शार्दुलला काय सांगितले याचा खुलासा जाडेजानेच केला.

#MSDhoni @ 15 … ‘कॅप्टन कूल’वर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

जाडेजाची दमदार खेळी –

“विराट मैदानावर असेपर्यंत त्याला साथ देणे आणि एकेरी धाव घेत त्याला स्ट्राईक देणे हा माझा विचार होता. पण विराट बाद झाल्यावर मी स्वत:ला समजावलं की मला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर तग धरून राहावे लागणार आहे. रविवारचा सामना हा अत्यंत निर्णायक होता. त्यामुळे माझी खेळी महत्त्वाची असणार होती. तशातच शार्दुल ठाकूर मैदानात आला त्यावेळी मीच त्याला सांगितलं की खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो आहे. त्यामुळे आपण एकेरी – दुहेरी धावा घेत राहू या. जर आपण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहिलो आणि प्रत्येक चेंडू योग्य पद्धतीने खेळला तर आपण नक्कीच विजयी होऊ, असं शार्दुलला सांगितलं होतं असा खुलासा जाडेजाने केला.

Video : एकदा पाहाच युवा गोलंदाज नवदीप सैनीचा भन्नाट यॉर्कर…

पहा शार्दुलची फटकेबाजी –

जाडेजा-शार्दुलने चढवला विजयाचा कळस

प्रथम फलंदाजी करताना निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्ड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ३१५ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा केला. शे होप, एविन लुईस, रॉस्टन चेस आणि हेटमायर यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. पण अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला ३०० पार पोहोचवले. पूरनने ८९ तर पोलार्डने नाबाद ७४ धावा केल्या. सैनीने २ तर जाडेजा, शार्दुल आणि शमीने १-१ बळी टिपला.

Video : राहुलचा ‘मिनी-हेलिकॉप्टर’ शॉट पाहिलात का?

विंडीजने विजयासाठी दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतके झळकावली. राहुलने ७७ तर रोहितने ६३ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर, केदार जाध आणि ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतले. पण विराटने एक बाजू लावून धरत रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला. विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना विराट त्रिफळाचीत झाला. ८५ धावांवर त्याला माघारी परतावे लागले. यानंतर रविंद्र जाडेजा आणि मुंबईकर शार्दुल ठाकूर या दोघांनी योग्य वेळी फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला.