भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात, पहिली कसोटी सुरु होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटीआधीच भारतीय संघाचा महत्वाचा फिरकीपटू रविंद्र जाडेजा हा आजारी पडल्याचं समजतंय. बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, गेल्या दोन दिवसांपासून रविंद्र जाडेजाला त्रास जाणवत होता त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याला आम्ही रुग्णालयात दाखल केलं आहे.

अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेतला दुष्काळ भारतीय संघाच्या पथ्यावर??

स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने बीसीसीआयचं वैद्यकीय पथक जाडेजाच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहे. पुढील ४८ तासात जाडेजाच्या प्रकृतीत सुधारणा होईल असा अंदाज स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटीसाठी जाडेजाचा संघात समावेश करायचा की नाही याचा निर्णय अंतिम दिवशी घेण्यात येईल.

अवश्य वाचा – भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत डेल स्टेनच्या सहभागावर प्रश्नचिन्ह

याआधीही भारताचा सलामीवीर शिखर धवन पायाला झालेल्या घोट्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. शिखर धवनच्या जागी लोकेश राहुल भारतीय संघात सलामीच्या जागेवर फलंदाजीसाठी येणार आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारतीय संघ आफ्रिकेच्या आव्हानाला कसं तोंड देतो हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी भारतीय संघाला अपशकुन