01 March 2021

News Flash

मांजरेकर म्हणतात, सामनावीर गोलंदाज असायला हवा ! रविंद्र जाडेजाने दिलं भन्नाट उत्तर…

दुसऱ्या सामन्यात राहुल ठरला सामनावीर

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ७ गडी राखून मात केली. ५ सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-० ने आघाडीवर आहे. नाबाद अर्धशतकी खेळीसाठी लोकेश राहुलला सामनावीर पुरस्कार घोषित करण्यात आला. मात्र भारताच्या काही माजी खेळाडूंनी यावर आक्षेप घेत, गोलंदाजांमुळे भारत सामना जिंकला असून…रविंद्र जाडेजा सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी असल्याचं म्हटलं.

अवश्य वाचा – गोलंदाजांनी सामना जिंकवला, सामनावीराचा पुरस्कार लोकेश राहुलला का??

माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर, दुसऱ्या सामन्यात गोलंदाजाला सामनावीराचा पुरस्कार मिळायला हवा होता..असं वक्तव्य केलं.

रविंद्र जाडेजानेही मांजरेकर यांच्या वक्तव्यावर, कोणत्या गोलंदाजाला, कृपया त्याचं नाव सांगा…असं मिष्कील उत्तर दिलं.

यावर संजय मांजरेकर यांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं.

रविंद्र जाडेजाने दुसऱ्या टी-२० सामन्यात ४ षटकात १८ धावा देत २ बळी घेतले. या मालिकेतला तिसरा सामना बुधवारी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 10:51 am

Web Title: ravindra jadeja teases sanjay manjrekar as the two bury differences with funny banter after 2nd t20i psd 91
Next Stories
1 गोलंदाजांनी सामना जिंकवला, सामनावीराचा पुरस्कार लोकेश राहुलला का??
2 प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी
3 हॉकी इंडियाचं स्तुत्य पाऊल, ऑस्ट्रेलिया वणव्यातील पीडितांना १८ लाखांची मदत
Just Now!
X