पावसाचा व्यत्यय आल्याने मध्यावर थांबवण्यात आलेला भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानचा उपांत्य फेरीतील सामना दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरु झाला आहे. काल जेथे सामना संपला तेथून म्हणजेच ४६.१ षटाकांपासून हा सामना सुरु झाला. न्यूझीलंडच्या संघाला डावातील उर्वरीत ३.५ षटकांमध्ये २८ धावा जोडता आल्या आणि त्यांचा डाव २३९ धावांवर संपला. मात्र खऱ्या अर्थाने आजची सकाळ रविंद्र जाडेजाची ठरली असं म्हणता येईल. जाडेजाने मैदानात जम बसलेल्या रॉल टेरलला धावबाद केले तर टॉम लॅथमचा भन्नाट झेल घेतला. जाडेजाने सुरेख क्षेत्ररक्षण करत धावाही रोखल्या. आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर अवघ्या दोन समान्यांमध्ये जाडेजा हा विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी करत सर्वाधिक धावा रोखणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे.

विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा रोखणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये जाडेजाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे या यादीमधील इतर खेळाडू नऊ ते सात सामने खेळून या यादीमध्ये विराजमान झालेले असताना जाडेजाने अवघ्या दोन सामन्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. दोन सामन्यांमध्ये जाडेजाने आतील सर्कलमध्ये २४ धावा वाचवल्या आहेत तर बाहेरील सर्कमध्ये म्हणजेच आऊट फिल्डमध्ये १७ धावा वाचवल्या आहेत. जाडेजाने एकूण ४१ धावा वाचवल्या असून तो सर्वाधिक धावा वाचवणारा खेळाडू ठरला आहे. जाडेजा खालोखाल या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर ३४ धावांसहीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल, तिसऱ्या स्थानावर ३२ धावांसहीत ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचाच मार्कस स्टॉनिस (२७ धावा) तर पाचव्या स्थानी वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रील (२७ धावा) यांचा समावेश आहे. सर्वाधिक धावा वाचवणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये साखळी सामन्यातील भारताच्या शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत एकाही खेळाडूचा समावेश नव्हता. मात्र साखळी फेरीतील श्रीलंकेविरुद्धचा सामना आणि उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धचा सामना जाडेजा खेळला आणि तो या यादीत थेट पहिल्या क्रमांकावर आला.

जाडेजाच्या या कामगिरीबद्दल ट्विटवरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

१)

२)

३)

४)

५)

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेमध्ये जाडेजाने श्रेत्ररक्षणामध्ये चमक दाखवण्याची ही काही पाहिली वेळ नाही. साखळी सामन्यांमधील दोन सामन्यांमध्ये बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करताना त्याने दोन भन्नाट झेल पकडले होते.