देवधर चषक क्रिकेट स्पर्धेत, अंबाती रायुडूकडे भारत ‘अ’ तर उन्मुक्त चंदकडे भारत ‘ब’ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात रणजी हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या दोन्ही संघांत संधी देण्यात आली आहे. भारतीय संघात प्रवेशासाठी उत्सुक खेळाडूंना ही स्पर्धा उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. मुंबईच्या धवल कुलकर्णी, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर तसेच शार्दूल ठाकूरचा या संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे.  महाराष्ट्राच्या केदार जाधवला संधी देण्यात आली आहे. २४ ते २८ जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

भारत ‘अ’ : मुरली विजय, जलाज सक्सेना, मनदीप सिंग, अंबाती रायुडू (कर्णधार) केदार जाधव, नमन ओझा, परवेझ रसूल, अमित मिश्रा, शाहबाझ नदीम, सिद्धार्थ कौल, श्रीनाथ अरविंद, वरुण आरोन, कृष्णा दास, सुदीप चॅटर्जी, फैझ फझल.

भारत ‘ब’: उन्मुक्त चंद (कर्णधार), मयांक अगरवाल, बाबा अपराजित, श्रेयस अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, दिनेश कार्तिक, स्टुअर्ट बिन्नी, कर्ण शर्मा, जयंत यादव, धवल कुलकर्णी, नथू सिंग, शार्दूल ठाकूर, पवन नेगी, सचिन बेबी, सूर्यकुमार यादव.