मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीच्या डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली. कृणाल पंड्याचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली. विशेष म्हणजे दुखापतीनंतरही विराट मैदानात खेळत राहिला.

१९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडुवर कृणाल पंड्या चेंडू तटावला. त्याचा झेल पकडताना विराटला अंदाज आला नाही आणि थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळला. हा चेंडू डोळ्याच्या खाली लागल्याने पूर्ण डोळा सुजला. मात्र कोहलीने या दुखापतीची तमा न बाळगता मैदानात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेदना थांबवण्यासाठी तो डोळ्याखाली बर्फ लावताना मैदानात दिसत होता. त्याच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. कर्णधाराला शोभेल असा वागलास अशा कमेंट्स देत आहेत.

कृणाल पंड्याला जीवदान मिळूनही तो काही साजेशी कामगिरी करु शकला अवघ्या ७ धावा करुन तो तंबूत परतला.

‘…आणि कृणाल पंड्याच्या हाती दांडा राहिला’

विराट कोहलीचं आपल्या फिटनेसकडे चांगलंच लक्ष असतं. त्याचबरोबर चपळतेमुळे मैदानात क्षेत्ररक्षणही दमदार करतो. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विराटने रोहितला धावचीत केलं. ख्रिस लिन आणि रोहितमधील संवादाचा अभाव त्याने हेरला आणि थेट स्टम्पवर चेंडू फेकत बाद केले. रोहित अवघ्या १९ धावा करुन तंबूत परतला.

विराट फक्त इतक्यावरच थांबला नाही तर वॉशिंग्टनसोबत फलंदाजीसाठी आघाडीला आला. विराटने २९ चेंडुत ३३ धावांची खेळी केली. यात त्याने ४ चौकार मारले. मात्र जसप्रीस बुमराच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन तंबूत परतला.