20 January 2021

News Flash

RCB प्रशिक्षकांचा आयपीएल भारताबाहेर खेळवण्याला पाठींबा

लंकन क्रिकेट बोर्डाचीही BCCI ला ऑफर

देशभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र RCB संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटीच यांनी आयपीएल भारताबाहेर खेळवण्याच्या कल्पनेला आपला पाठींबा दर्शवला आहे. गुरुवारी श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही बीसीसीआयला आयपीएल लंकेत खेळवण्याची ऑफर दिली होती.

“ऑस्ट्रेलिया असो किंवा इतर कोणताही देश, भारताबाहेर आयपीएल नक्कीच खेळवता येईल. असा निर्णय झालास काही संघांसाठी हे फायदेशीरच ठरणार आहे, विशेषकरुन RCB साठी…बहुतांश संघांमध्ये ऑस्ट्रेलियन आणि दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचा भरणा अधिक आहे. त्यामुळे आयपीएल भारताबाहेर हलवण्याचा विचार होत असेल तर त्याला माझा पाठींबा आहे.” सामयन कॅटीच ऑस्ट्रेलियातील SEN Radio ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

आयपीएल ही नुसती क्रिकेट स्पर्धा नसून यावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. बीसीसीआय आणि संघमालकांनाही या स्पर्धेतून चांगलं उत्पन्न मिळतं, त्यामुळे बीसीसीआय आता याबद्दल नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असं कॅटीचने स्पष्ट केलं. २९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार होता. परंतु करोनामुळे देशातल्या परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे बीसीसीआयने अखेरीस स्पर्धा स्थगित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 4:01 pm

Web Title: rcb coach simon katich open to ipl outside india psd 91
Next Stories
1 इशांतने दिलं चॅलेंज, विराटने दिला मजेशीर रिप्लाय
2 सलमान की धोनी निवड करणं म्हणजे आई की बाबा या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं – केदार जाधव
3 ‘टीम इंडिया’च्या स्टार खेळाडूला एलिस पेरीसोबत हवी ‘डिनर डेट’
Just Now!
X