News Flash

आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सराव सुरू

'या' खेळाडूंची आहे उपस्थिती

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ

आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) येत्या 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या आगामी 14व्या मोसमासाठी काल मंगळवारपासून श्री. रामचंद्र उच्च शिक्षण व संशोधन संस्था येथे प्रशिक्षण सुरू केले आहे. आरसीबी आपला पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स बरोबर 9 एप्रिल रोजी चेन्नई येथे खेळणार आहे. कर्णधार विराट कोहली 1 एप्रिलला संघात सामील होईल.

संघाच्या प्रशिक्षण शिबिरात यजुर्वेंद्र चहल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, मोहम्मद अझरुद्दीन, रजत पाटीदार, सचिन बेबी, सुयश प्रभुदेसाई आणि के एस भरत यांचा समावेश आहे. तर, उर्वरित खेळाडू नंतर शिबिरात सामील होतील.

 

आरसीबीच्या म्हणण्यानुसार, हे खेळाडू सात दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर संघात सामील होतील. क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माइक हेसन आणि मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांच्या मार्गदर्शनाखाली असीबीची नऊ दिवसीय कंडीशनिंग शिबिर चालविण्यात येत आहे. या संघात संजय बांगर, एस. श्रीधरन, अ‍ॅडम ग्रिफिथ, शंकर बासू आणि मलोलन रंगराजन हे प्रशिक्षक कर्मचारी आहेत.

विराटच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएलचा 13वा ‘ठीक’ गेला. चांगली कामगिरी करूनही विराटसेनेने हैदराबादकडून पराभव स्वीकारत प्ले ऑफचा प्रवास थांबवला. यंदाच्या लिलावात आरसीबीने 35.40 कोटी पैकी 34 कोटी तीन अष्टपैलू खेळाडूंवर खर्च केले. त्यांनी न्यूझीलंडच्या काईल जेम्ससनला 15 कोटी, ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला 14.25 आणि ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल ख्रिश्चनला 4.8 कोटींची बोली लावत संघात घेतले.

आरसीबीची इतर खेळाडूंवर बोली

  • सचिन बेबी (20 लाख)
  • रजत पाटीदार (20 लाख)
  • मोहम्मद अझरुद्दीन (20 लाख)
  • सुयश प्रभुदेसाई (20 लाख)
  • के. एस. भरत (20 लाख)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 11:08 am

Web Title: rcb starts their training in chennai for ipl 2021 adn 96
टॅग : IPL 2021,Rcb
Next Stories
1 IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार झाल्यानंतर रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
2 अखेर ठरलं; Rishabh Pant करणार आयपीएल २०२१मध्ये Delhi Capitals चं नेतृत्व!
3 CSKची एक जर्सी आणि 15 प्लास्टिकच्या बाटल्या… वाचा काय आहे कनेक्शन
Just Now!
X