News Flash

अखेरच्या षटकांसाठी सज्ज -द्रविड

गेल्या मोसमामध्ये अखेरच्या षटकांमध्ये जास्त धावा दिल्याने राजस्थान रॉयल्सला जास्त विजय मिळवता आले नव्हते. या समस्येवर उपाय शोधत, या अखेरच्या षटकांसाठी सज्ज असल्याचे कर्णधार राहुल

| April 3, 2013 03:03 am

गेल्या मोसमामध्ये अखेरच्या षटकांमध्ये जास्त धावा दिल्याने राजस्थान रॉयल्सला जास्त विजय मिळवता आले नव्हते. या समस्येवर उपाय शोधत, या अखेरच्या षटकांसाठी सज्ज असल्याचे कर्णधार राहुल द्रविडने सांगितले.
‘‘यावेळी आमची गोलंदाजी अधिक भेदक असेल. गेल्या वर्षी एस. श्रीशांत, शॉन टेट आणि केव्हिन कूपर हे दुखापतग्रस्त होते, त्याचबरोबर शेन वॉटसनही गेल्या वर्षी बरेच सामने खेळला नव्हता. त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये युवा गोलंदाजांना गोलंदाजी करण्याची वेळ आली होती. पण या वर्षी सारेच गोलंदाज तंदुरुस्त आहेत, त्याचबरोबर फिडेल एडवर्ड्स आणि जेम्स फाउल्कनरही संघात असल्याने यावेळी आमची गोलंदाजी नक्कीच चांगली होईल,’’ असा विश्वास द्रविडने व्यक्त केला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘शॉन आणि जेम्स हे दोन्ही ऑस्ट्रेलियाचे दर्जेदार गोलंदाज आहेत. त्याचबरोबर एडवर्ड्सकडे चांगला वेग आहे. एस. श्रीशांत हा बळी मिळवण्यासाठी भुकेला आहे, त्यामुळे यंदा आम्हाला गोलंदाजीची समस्या जाणवणार नाही.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:03 am

Web Title: ready for last overssays dravid
टॅग : Ipl
Next Stories
1 एकच संघटना असावी ही तर शरीरसौष्ठवपटूंची इच्छा!
2 महाराष्ट्र खो-खो प्रीमियर लीगचा थरार ११ एप्रिलपासून
3 विजेंदरला क्रीडा मंत्रालयाचा ठोसा, उत्तेजक चाचणीस सामोरे जावे लागणार
Just Now!
X