04 June 2020

News Flash

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : क्रूसच्या निर्णायक गोलमुळे माद्रिदचा पहिला विजय

तुर्क टेलिकॉम एरिनावर रंगलेल्या या सामन्यात माद्रिदने लुका मॉड्रिचला विश्रांती दिली होती

सामन्यातील एकमेव गोल झळकावल्यानंतर आनंद साजरा करताना टॉनी क्रूस (डावीकडून पहिला).

इस्तंबूल : मध्यरक्षक टॉनी क्रूसने साकारलेल्या निर्णायक गोलच्या बळावर माजी विजेत्या रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये ‘अ’ गटातील सामन्यात गॅलेटसॅरे संघाला १-० असे पराभूत केले. या हंगामातील माद्रिदचा हा पहिलाच विजय ठरला.

तुर्क टेलिकॉम एरिनावर रंगलेल्या या सामन्यात माद्रिदने लुका मॉड्रिचला विश्रांती दिली होती. परंतु एडिन हॅझार्ड, करिम बेन्झेमा यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या समावेशामुळे माद्रिदने नेहमीप्रमाणेच आक्रमणावर भर दिला. १८व्या मिनिटाला हॅझार्डने गोलजाळ्याच्या डाव्या दिशेने दिलेल्या पासचे क्रूसने अप्रतिमरीत्या गोलमध्ये रूपांतर करून माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतरही गॅलेटसॅरेला बरोबरी साधण्यात अपयश आल्यामुळे माद्रिदच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांपैकी एका लढतीत माद्रिदला पराभव पत्करावा लागला होता, तर एक सामना त्यांना बरोबरीत सोडवण्यात यश आले. या विजयासह माद्रिदचे तीन सामन्यांतून चार गुण झाले असून पॅरिस सेंट जर्मेनने सर्वाधिक नऊ गुणांसह गटात अग्रस्थान मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 12:02 am

Web Title: real madrid beat galatasaray in uefa champions league zws 70
Next Stories
1 जागतिक स्क्वॉश स्पर्धा : जोश्नाची विजयी सलामी
2 कर्नाटकचा विजेतेपदाचा ‘चौकार’; ‘बर्थ-डे बॉय’ अभिमन्यूचा ‘दुहेरी’ सन्मान
3 Video : विद्यार्थी असताना डोक्यात होता ‘हा’ विचार – सचिन
Just Now!
X