गॅरेथ बॅलेने साकारलेल्या दोन गोलच्या बळावर ला लिगा फुटबॉलमध्ये रेयाल माद्रिदने व्हिलारेयालला २-२ असे बरोबरीत रोखले. संघाची भूमिका चोख बजावल्यानंतर बॅलेला मैदान सोडावे लागले.

गेरार्ड मोरेनोने १२व्या मिनिटाला व्हिलारेयालचे खाते उघडले; परंतु पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत बॅलेने रेयालला बरोबरी साधून दिली. मग दुसऱ्या सत्रात ७४व्या मिनिटाला गोमेझ बडरेनांडोने व्हिलारेयालच्या खात्यावर दुसऱ्या गोलची भर घतली. परंतु सामना संपायला चार मिनिटे शिल्लक असताना बॅलेने पुन्हा रेयालला बरोबरी साधून दिली. दोन पिवळी कार्डे मिळाल्यामुळे भरपाई वेळेत ९४व्या मिनिटाला मैदान सोडावे लागले.