News Flash

दोन वर्षे रिअल माद्रिदसोबतच -रोनाल्डो

‘‘रिअल माद्रिदसोबत २०१८ पर्यंतचा करार संपुष्टात येईपर्यंत याच क्लबसोबत राहणार आहे,

| February 10, 2016 07:01 am

पिचीची पुरस्कार विजेता ख्रिस्तीयानो रोनाल्डोसह माद्रिदचे माजी प्रशिक्षक कार्लो अँसेलोट्टी (ला लिगा वर्षांतील सर्वोत्तम प्रशिक्षक) आणि सेर्गिओ रॅमोस (स्पेनच्या राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम खेळाडू).

‘‘रिअल माद्रिदसोबत २०१८ पर्यंतचा करार संपुष्टात येईपर्यंत याच क्लबसोबत राहणार आहे,’’ असे पोर्तुगालचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सांगून माद्रिदला सोडचिठ्ठी देण्याच्या अफवांना पूर्णविराम लावला. रोनाल्डो पॅरिस सेंट जर्मेन किंवा मँचेस्टर युनायटेड या क्लबच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, परंतु रोनाल्डोने करार संपुष्टात येईपर्यंत माद्रिदसोबत राहण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पर्यायांचा विचार केला जाईल, असेही तो म्हणाला.
‘‘गेली सहा वष्रे मी स्पेनमध्ये आहे. मँचेस्टर युनायटेडमध्येही सहा वष्रे होतो आणि तो अनुभव अविस्मरणीय होता. युनायटेड अव्वल क्लब आहे, परंतु माझ्यासाठी ही जगातील सर्वोत्तम लीग आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे येथे राहायचे आहे. त्यानंतर पुढचा विचार. ’’ असे रोनाल्डोने सांगितले.
ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या गेल्या सत्रात सर्वाधिक गोलची नोंद करणाऱ्या रोनाल्डोला ‘पिचीची’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2016 7:01 am

Web Title: real madrid contract still valid for 2 years says ronaldo
टॅग : Real Madrid,Ronaldo
Next Stories
1 लिओनेल मेस्सीच्या मूत्रपिंड विकारावर उपचार सुरू
2 प्रो कबड्डी लीग : पाटण्याचा बंगालवर धक्कादायक विजय
3 ट्वेन्टी- २० विश्वचषकासाठी स्मिथकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व
Just Now!
X