News Flash

ला लिगा फुटबॉल स्पर्धा : कॅसेमिरोच्या गोलमुळे रिअल माद्रिदचा विजय

रिअल माद्रिद संघाला ला लीग फुटबॉल स्पर्धेत लास पाल्मस संघावर २-१ असा विजय मिळविता आला.

विजयानंतर जल्लोष साजरा करताना रिअल माद्रिदचे खेळाडू.

मध्यरक्षक कॅसेमिरोने केलेल्या अप्रतिम गोलमुळेच रिअल माद्रिद संघाला ला लीग फुटबॉल स्पर्धेत लास पाल्मस संघावर २-१ असा विजय मिळविता आला. चुरशीच्या झालेल्या या लढतीत सर्जिओ रामोसने उत्कृष्ट हेडर करत माद्रिद संघाचे खाते उघडले. मात्र लास पाल्मस संघाच्या विलियन होजेने खेळ संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना गोल केला व १-१ अशी बरोबरी साधली. हा सामना बरोबरीत संपणार असे वाटले होते, मात्र कॅसेमिरो याने हेडरचाच उपयोग करीत संघाचा विजयी गोल नोंदविला. अन्य लढतीत सेव्हिला संघाने विलारिअल संघावर ४-२ अशी मात केली.
व्हॅलेन्सिया संघाला लेवान्टे संघाविरुद्ध ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी व्हॅलेन्सिया संघाला युरोपा लीगमध्ये अ‍ॅथलेटिक बिलबाओ संघाकडूनही याच फरकाने पराभव पत्करावा लागला होता. बिलबाओ संघाने रिअल बेटिस संघाचा ३-१ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 5:54 am

Web Title: real madrid earn late win at las palmas with rare casemiro goal
टॅग : Real Madrid
Next Stories
1 स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा : सायना, श्रीकांत विजयपथावर परतणार?
2 आफ्रिदीच्या वक्तव्याची शरम वाटते -मियाँदाद
3 EXCLUSIVE: …म्हणून आजच्या सामन्यात भारताचे पारडे जड
Just Now!
X