उपांत्य फेरीच्या पहिल्या लीग लढतीत गोलशून्य बरोबरी; रोनाल्डोची अनुपस्थिती
लंडनमधील मँचेस्टर येथील इटिहॅड स्टेडियमवर मंगळवारी दोन तुल्यबळ संघांमधील तोडीस तोड कामगिरीचा अनुभवायला मिळाला. युरोपियन फुटबॉल महासंघ अर्थात यूएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीत यजमान मँचेस्टर सिटी आणि रिअल माद्रिद यांच्यातील पहिल्या लीग लढतीने साऱ्यांची मने जिंकली. धारधार आक्रमण, अभेद्य बचाव आणि चपळता याचा आस्वाद या लढतीत अनुभवायला मिळाला. त्यामुळेच एकास एक वरचढ असलेल्या या दोन्ही संघांनी अनेक प्रयत्नानंतरही निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.
चॅम्पियन्स लीग स्पध्रेत सर्वाधिक गोल करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोशिवाय मैदानात उतरलेल्या माद्रिदने यजमानांना चांगलेच झुंजवले. गॅरेथ बेल, करिम बेंझेमा आणि लुकास व्हॅझेक्युझ या नव्या समीकरणासहही माद्रिदचे आक्रमण प्रभावी दिसत होते, परंतु सिटीचा गोलरक्षक जो हार्ट तो थोपवण्यासाठी सक्षम होता. त्याने माद्रिदचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न हाणून पाडल्यामुळे यजमानांवरील पराभवाची नामुष्की टळली. या हंगामात प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरही आम्ही अप्रतिम खेळ केला आहे. याच आत्मविश्वासाने आम्ही दुसऱ्या लीग लढतीत माद्रिदचा सामना करणार आहोत. माद्रिदच्या आक्रमणात थोडीफार वाढ होईल. पहिली लीग लढत निष्फळ ठरली.
‘‘आम्ही अतिशय प्रखर खेळ केला आणि बचावही चांगला केला. या हंगामात प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरही आम्ही अप्रतिम खेळ केला आहे. याच आत्मविश्वासाने आम्ही दुसऱ्या लीग लढतीत माद्रिदचा सामना करणार आहोत. माद्रिदच्या आक्रमणात थोडीफार वाढ होईल. पहिली लीग लढत निष्फळ ठरली,’ असे मत सिटीचे प्रशिक्षक मॅन्युएल पेलेग्रिनी यांनी व्यक्त केले. रोनाल्डोच्या अनुपस्थितीतही माद्रिदने दमदार खेळ केला. ‘‘दुसऱ्या सत्रात चेंडूवर सर्वाधिक ताबा आमचा होता. तसेच गोल करण्याच्या संधीही मिळाल्या. मात्र, त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आल्याने निराश झालो. तरीही संघाच्या कामगिरीवर खूश आहे,’’ असे माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी सांगितले.