News Flash

रिअल माद्रिदच्या जेतेपदाच्या आशा धूसर

लीगा फुटबॉल स्पध्रेचे जेतेपद पटकावण्याच्या रिअल माद्रिदच्या मनसुब्याला सुरुंग लागला आहे.

| December 15, 2015 05:24 am

विजयानंतर आनंद व्यक्त करताना व्हिलारिअल क्लबचे खेळाडू

व्हिलारिअलकडून पराभव

अ‍ॅटलेटिको माद्रिद, बार्सिलोना अव्वल स्थानी
लीगा फुटबॉल स्पध्रेचे जेतेपद पटकावण्याच्या रिअल माद्रिदच्या मनसुब्याला सुरुंग लागला आहे. राबेटरे सोल्डोडोच्या (८ मि.) गोलच्या जोरावर व्हिलारिअल क्लबने माद्रिदवर १-० असा सोपा विजय मिळवला. दुसरीकडे अ‍ॅटलेटिको माद्रिदने २-१ अशा फरकाने अ‍ॅथलेटिक बिलबाओवर विजय मिळवून गुणतालिकेत बार्सिलोनासह संयुक्तरीत्या अव्वल स्थान पटकावले आहे. अव्वल स्थानावर असलेल्या बार्सिलोना व अ‍ॅटलेटिको संघापासून माद्रिद (३० गुण) पाच गुणांनी पिछाडीवर आहे. ही पिछाडी भरून काढणे माद्रिदला जवळपास अशक्य असल्याने त्यांच्या जेतेपदाचा आशा धूसर झाल्या आहेत.
घरच्या मैदानावर बार्सिलोनाकडून ४-० अशा लाजिरवाण्या पराभवानंतर रिअल माद्रिदने सलग पाच विजयांची नोंद केली, परंतु व्हिलारिअलवरील सामन्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख खालावला. व्हिलारिअल स्टेडियमवरील माद्रिदचा गेल्या पाच लढतींमधील हा तिसरा पराभव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 5:06 am

Web Title: real madrid hopes of champion may blurred
टॅग : Real Madrid
Next Stories
1 गतविजेत्या बार्सिलोनासमोर आर्सेनलचा अडथळा
2 ट्वेन्टी- २० विश्वचषकासाठी मोहालीला हिरवा कंदील
3 मतभेद विसरून जोश्ना व दीपिका पुन्हा एकत्र
Just Now!
X