News Flash

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : नवा डाव, जुने प्रतिस्पर्धी!

रिअलने आत्तापर्यंत ११ वेळा चॅम्पियन्स लीगचा चषक उंचावला आहे

रिअलने आत्तापर्यंत ११ वेळा चॅम्पियन्स लीगचा चषक उंचावला आहे

रिअल-अ‍ॅटलेटिको उपांत्य फेरीचा सामना आज

रिअल माद्रिद आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद एकाच शहरातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेत पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीची पहिली लीग लढत रिअल माद्रिदच्या घरच्या मैदानावर होणार आहे. चॅम्पियन्स लीगच्या सलग चौथ्या मोसमात हे प्रतिस्पर्धी बाद फेरीत एकमेकांविरुद्ध खेळणार असून अ‍ॅटलेटिकोला एकदाही रिअलचा अडथळा पार करता आलेला नाही. त्यामुळे घरच्या पाठीराख्यांसमोर रिअलचे पारडे जड असणार आहे.

रिअलने आत्तापर्यंत ११ वेळा चॅम्पियन्स लीगचा चषक उंचावला आहे, तर गतवर्षी पहिल्यांदा हा मान पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या अ‍ॅटलेटिकोचा अश्वमेध रिअलने अडवला होता. त्यामुळे अ‍ॅटलेटिकोला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २०१३-१४ व २०१५-१६च्या मोसमाच्या अंतिम फेरीत माद्रिद शहरातील हे दोन्ही क्लब एकमेकांविरुद्ध खेळले आणि त्यात रिअलने बाजी मारली. त्यामुळे हा पराभवाचा वचपा काढण्यासाठी अ‍ॅटलेटिको प्रयत्नशील असणार आहे.

सामन्याची वेळ : मध्यरात्री १२.१५ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : सोनी ईएसपीएन एचडी, टेन २

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 2:09 am

Web Title: real madrid vs atletico 2017 champions league semifinal draw
Next Stories
1 व्यग्र वेळापत्रकामुळे युनायटेडची पिछेहाट
2 महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या विकासासाठी सांगलीत प्रगत कबड्डी प्रशिक्षण शिबीर
3 आशियाई बॉक्सिंग  स्पर्धा : विकास, गौरव उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X