News Flash

रेयाल माद्रिदचा शानदार विजय

रेयाल माद्रिदच्या विजयात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलचा महत्त्वाचा वाटा आहे.

रोनाल्डोचे त्रिशतक

रेयाल माद्रिदने स्पॅनिश लीगमध्ये गेटॅफे संघाला ३-१ अशा फरकाने आरामात नामोहरम करीत फ्रान्सकडे प्रयाण केले आहे. त्यामुळे पॅरिस सेंट-जर्मेनशी (पीएसजी) होणाऱ्या आगामी लढतीच्या पाश्र्वभूमीवर झिनेदीन झिदानच्या मार्गदर्शनाखालील रेयाल माद्रिदचा आत्मविश्वास दुणावला आहे.

रेयाल माद्रिदच्या विजयात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलचा महत्त्वाचा वाटा आहे. याचप्रमाणे गॅरेथ बॅलेने एक गोल केला. त्यामुळेच १० सदस्यीय गेटॅफेला सहज हरवले. चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये मंगळवारी रेयाल माद्रिदचा सामना पॅरिस सेंट-जर्मेनशी होणार आहे. महत्त्वाच्या सामन्याआधी मिळवलेला विजय हा आत्मविश्वास वाढवणारा असतो, असे प्रशिक्षक झिदान यांनी सांगितले.

बॅलेने २४व्या मिनिटाला रेयालचे खाते उघडले. त्यानंतर रोनाल्डोने पहिल्या सत्रातील भरपाई वेळेत पहिला गोल केला, तर दुसऱ्या सत्रातील ७८व्या मिनिटाला मार्सेलोच्या पासवर अप्रतिम हेडर साकारला. ला लिगा स्पध्रेत रोनाल्डोने गोलचे वेगवान त्रिशतक झळकावले आहे. २८६ सामन्यांत त्याच्या खात्यावर आता ३०१ गोल जमा आहेत. गेल्या पाच सामन्यांत त्याने १० गोल नोंदवले आहेत.

तिसऱ्या स्थानासाठी माद्रिदची व्हॅलेंशियाशी स्पर्धा आहे. व्हॅलेंशिया ४ गुणांनी पिछाडीवर असले तरी त्यांचा मायदेशातील सामना रेयाल बेटिसविरुद्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 2:23 am

Web Title: real madrid win in la liga football
Next Stories
1 अझलन शहा हॉकी २०१८ – भारताच्या हातून विजयाची संधी निसटली, इंग्लंडची अखेरच्या क्षणात बरोबरी
2 VIDEO : अबॉटच्या ‘या’ उसळत्या चेंडूमुळे दुर्दैवी आठवणींना पुन्हा जाग
3 IPL 2018 – व्यंकटेश प्रसाद किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त
Just Now!
X