News Flash

टी-20 मालिका : इंग्लंडविरुद्धचा पराभव ‘या’ तीन कारणांमुळे!

तिसऱ्या टी-20मध्ये भारत इंग्लंडची 'हवा' काढणार अशी अपेक्षा होती, पण चित्र पालटले.

दुसऱ्या टी-20 सामन्यात दमदार विजय नोंदवल्यानंतर तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया इंग्लंडची ‘हवा’ काढणार करणार, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, सांघिक कामगिरीच्या जोरावर इयान मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंडने भारताला आठ गडी राखून सहज मात दिली. कर्णधार विराट कोहली वगळता एकाही खेळाडूला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आता मालिका जिंकण्यासाठी दबावात असलेल्या टीम इंडियाला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेईल, असा अंदाज वर्तविला जात होता, पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. खाली दिलेल्या तीन कारणांमुळे विराटसेनेला पराभवाचा सामना करावा लागला.

भारताची वरची फळी ढेपाळली

भारतीय संघाने जेव्हा फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हापासून त्यांच्यावर दबाव जाणवत होता. फॉर्म हरवलेल्या केएल राहुल व्यतिरिक्त रोहित शर्मा आणि इशान किशनही सपशेल अपयशी ठरले. तिघांच्या वाईट कामगिरीमुळे भारताला पावरप्लेमध्ये अपेक्षित धावा काढता आल्या नाहीत. याचा परिणाम म्हणून त्यांना इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य उभारता आले नाही.

मार्क वूडची घातक गोलंदाजी

टॉम करनच्या जागी संधी मिळालेल्या मार्क वूडने वेगवान चेंडू आणि बाऊन्सर्सचा मारा करत टीम इंडियाच्या फलंदाजांवर लगाम घातला. वूडने त्याच्या स्पेलच्या तीन षटकांत एकही धाव खर्च केली नाही. त्याच्या 3 बळींमुळे भारताला कमी धावसंख्या उभारता आली.

बटलरचा भारताला दणका

इंग्लंडची पहिली विकेट पडल्यानंतर जोस बटलरने पदभार स्वीकारला आणि स्फोटक फलंदाजी केली. यावेळी बटलरने दबाव आणू दिला नाही. त्यामुळे त्यांचा धावफलक हलता राहिला. बटलरच्या नाबाद 83 खेळीने इंग्लंडला भारतावर सहज विजय मिळवता आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 11:07 am

Web Title: reasons behind indian teams defeat in third t20 against england adn 96
Next Stories
1 Road Safety World Series: आज सचिन-लारा सेमीफायनलमध्ये भिडणार
2 “करोनाच्या पार्श्वभूमीवर भारत-इंग्लंड टी-२० मालिका रद्द करा, अन्यथा आत्मदहन करेन”
3 “तो चॅम्पियन खेळाडू आहे, यापुढेही तो…”; विराटकडून के. एल. राहुलची पाठराखण
Just Now!
X