विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारतीय संघाला जेतेपद राखण्यात अपयश आले असले तरी भारतीय टेलिव्हिजन इतिहासात सर्वाधिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. भारतात ६३ कोटी ५० लाख प्रेक्षकांनी विश्वचषकाचा टीव्हीवर आस्वाद लुटल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. एखाद्या स्पध्रेला लाभलेली ही सर्वाधिक प्रेक्षकक्षमता आहे.
यापैकी ३० कोटी ९० लाख प्रेक्षकांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीची लढत टीव्हीवर पाहिली. यंदा पहिल्यांदाच विश्वचषक स्पध्रेचे हिंदी, बंगाली, तामीळ, मल्याळम् आणि कन्नड आदी सहा भाषांमध्ये प्रक्षेपण करण्यात आले. त्यात ७७ टक्के प्रेक्षकांनी हिंदी भाषेला पसंती दिली.